फोटो सौजन्य AI
इराणच्या दक्षिणेकडील मीनाब शहरातील शजरेह तय्यबेह शाळेवरील भीषण हल्ल्याला सहा महिने पूर्ण झाले आहेत . मात्र या हल्ल्यात आपल्या मुलांना गमावलेल्या पालकांचे दुःख अद्याप कमी झालेले नाही . शाळेची उध्वस्त इमारत आणि मुलांच्या कबरी आजही या दुर्घटनेच्या भयावह आठवणी जाग्या करतात .
मीनाबमधील रहिवाशी या ठिकाणी वारंवार भेट देत असून , आपल्या प्रियजनांच्या आठवणींना उजाळा देत आहेत . अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या सुरवातीच्या काळात हा हल्ला झाला होता . या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली . किमान १५५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते . शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी घडलेल्या या घटनेने स्थानिक नागरिकांमध्येही मोठी अस्वस्थता निर्माण केली आहे .
हल्ल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी उलटला तरी मृत मुलांच्या पालकांसाठी वेळ जणू थांबून राहिल्यासारखा आहे . मुलांच्या आठवणी , त्यांचे शाळेतील दिवस आणि कुटुंबासोबतच्या आठवणी आजही पालकांच्या मनात ताज्या आहेत . अनेक पालक आणि स्थानिक नागरिक शाळेच्या शाळेच्या अवशेषाजवळ तसेच मुलांच्या कबरीवर जाऊन श्रद्धांजली अर्पण करत आहेत .
उध्वस्त झालेली शाळेची इमारत या हल्ल्याची साक्ष देत आहे . एकेकाकी मुलांच्या आवाजाने गजबजलेला हा परिसर आता शांत झाला आहे . मात्र येथे येणाऱ्या पालकांच्या डोळ्यातून त्यांच्या वेदना स्पष्ट दिसून येतात . मुलांना गमावल्याचे दुःख आजही त्यांना असहाय्य झाले आहे.
इराणमधील या घटनेमुळे युद्ध आणि संघर्षाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना कसा बसतो , हे पुन्हा समोर आले आहे . संघर्षाच्या काळात लष्करी लक्षांबरोबर नागरी भाग आणि नागरिकांच्या सुरक्षेतीचा प्रश्नही गंभीर बनतो . शाळकरी मुलांसारखा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने या घटनेचे दुःख अधिक तीव्र झाले आहे .
मीनाबमधील नागरिकांसाठी सहा महिने केवळ कालावधी नाही , तर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थित गेलेले सहा महिने आहेत . मृत मुलांच्या कबरींना भेट देताना पालक त्यांच्या आठवणी जपत आहेत . त्यांच्या मानसिक आणि सामाजिक जखमा दीर्घकाळ राहिल्या आहेत .






