इस्त्रायल इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत? अमेरिकेसोबत मिळून करणार लष्करी कारवाई ( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम : इस्त्रायल आणि इराणमध्ये पुन्हा एखदा तणावाची चिन्ह दिसून लागली आहेत. मिडल इस्ठ क्कार्डली या मासिकाने एका लेखात दावा केला आहे की, इस्त्रायल इराणच्या परमाणु स्थळांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. हा अहवाल कॉलिन विंस्टन यंनी लिहिला असीन, त्यांनी CIA मध्ये 30 वर्ष कार्य केले आहे. त्यांनी अमेरिकन-इस्त्रायली पब्लिक अफेयर्स कमिटी (AIPAC) चे माजी संशोधन प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे.
अहवालातील दावे
विंस्टन यांनी लिहिलेल्या अहवालानुसार, इस्त्रायलने आपले लक्ष पूर्णतः इराणच्या अणुकार्यक्रमाकडे वळवले आहे. अहवालात म्हटले आहे की, इस्त्रायलने हिजबुल्लाह आणि हमासला मोठ्या प्रमाणावर कमकुवत केले असून, इराणच्या हवाई संरक्षण प्रणालीवरही मोठे आघात केले आहेत.
एवढेच नव्हे, तर इराणचे क्षेपणास्त्र सामर्थ्य देखील कमकुवत झाले आहे. याशिवाय, असाही दावा करण्यात आला आहे की, इराण अजूनही अणु बॉम्ब तयार करण्याच्या अत्यंत जवळ पोहोचले आहे आणि त्यांच्याकडे यासाठी पुरेसा युरेनियम साठा आहे.
इराण भविष्यात अमेरिका-इस्त्रायलसाठी बनू शकतो धोका
इराणचे अणु बॉम्ब बनवण्याचे कार्य वेळीच रोखले गेले नाही, तर भविष्यात इस्त्रायल आणि अमेरिकेसाठी मोठा धोका निर्माण होउ शकतो. यामुळे इस्त्रायल आणि अमेरिका एकत्र येऊन लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन प्रशासन सध्या कूटनीतिक मार्गाने इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, इराणने माघार घेतली नाही, तर इस्त्रायलसोबत मिळून हल्ल्याचा पर्याय वापरण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
इराणचा हिजबुल्लाहला शस्त्र पुरवठा करत आहे
दरम्यान इस्त्रायलच्या संरक्षण तज्ज्ञांनी, इराण हिजबुल्लाहला पुन्हा शस्त्र पुरवठा करत असल्याचा दावा केला आहे. यामुळे भविष्यात मोठा संघर्ष उभा राहू शकतो. 2024 नंतर इराणची हावाई संरक्षण क्षणता कमकुवत झाली आहे. यामुळे इस्त्रायलकडे हल्ला करण्यासाठी उत्तम संधी आहे. मात्र, जर इस्त्रायल आणि अमेरिका यांनी एकत्रितपणे हल्ला केला, तर संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
इराण इस्त्रायलचा मोठा शत्रू
इराण हमास, हिजबुल्लाह आणि हुथी यांना पाठिंबा देतो, त्यामुळे इराण हा इस्रायलच्या शत्रूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणला दडपण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत.