(फोटो सौजन्य: X)
जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राणी म्हणून सिंहाची ओळख आहे. आपल्या बलाढ्य शक्तीने तो क्षणातच कुणाचाही खात्मा करू शकतो आणि म्हणूनच फक्त संपूर्ण जंगल सिंहाला घाबरून असतं. अशातच आता सिंहाचा एक नवीन आणि सर्वांना हादरवणारा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत पण या व्हिडिओत मात्र सिंह कोणत्या प्राण्याची शिकार करताना नाही तर स्वतःच शिकार होताना दिसून आला आहे. आता सिंहाची शिकार करणारा हा प्राणी जंगलाचा एक मोठा शिकारी असेल असं तुम्हाला वाटत असेल पण असं नाही. सिंहाची ही शिकार म्हशींच्या कळपाने मिळून केली आहे जे पाहणं सर्वांसाठीच धक्कादायक ठरलं. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की सिंह म्हशींच्या कळपात अडकला आहे. तो कदाचित कमकुवत भक्ष्याच्या शोधात तिथे पोहोचला असेल आणि कळपाला घाबरवण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु म्हशींनी त्याच्यावर एकत्रितपणे हल्ला केला. म्हशींनी कळपात सिंहाला चारही बाजूंनी घेरले आणि काही वेळातच अनेक म्हशींनी त्यांच्या तीक्ष्ण शिंगांनी सिंहावर हल्ला करायला सुरुवात केली. सिंहाने स्वतःला वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त म्हशींनी त्याला सहज जाऊ दिले नाही. एकामागून एक म्हशी धावत राहिल्या आणि त्याच्यावर हल्ला करत राहिल्या. म्हशींनी अक्षरशः जंगलाच्या राजाला खेळण्याप्रमाणे खेळवलं जे पाहून सर्वांनाच धक्का बसला. शेवटी परिस्थिती अशी बनली की जंगलाच्या राजाला जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागले.
— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) September 7, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा कसला जंगलाचा राजा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो सिंह दिसायला हाडकुळा आहे, कदाचित त्याला खूप भूक लागली असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सिंह आता कधीही म्हशींसोबत पंगा घेणार नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.