Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Warns Iran : ‘गरज पडल्यास पुन्हा हल्ला करु’ ; US Iran शांतता चर्चेदरम्यान इस्रायलचा उघड इशारा

Israel Warns Iran : अमेरिका इराणमध्ये सध्या होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबात महत्त्वपूर्ण चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान इस्रायलने आक्रमक होत पुन्हा मोठ्या हल्ल्याची धमकी इराणला दिली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 25, 2026 | 11:04 AM
Israel Warns Iran of Military Action Amid US Iran Peace Talks

Israel Warns Iran of Military Action Amid US Iran Peace Talks

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण शांतता चर्चेदरम्यान इस्रायलची खुली धमकी
  • पुन्हा इराणवर हल्ला करणार इस्रायल
  • वाद पुन्हा चिघळणार?
Israel Warns Iran News in Marathi : जेरुसलेम : अमेरिका आणि इराणमध्ये दीर्घकाळापासून होर्मुझ(Hormuz) ची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा सुरु आहे. मात्र, जागतिक स्तरावर शांततेचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे इस्रायलने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणविरुद्ध पुन्हा लष्करी कारवाई सुरु करु, यासाठी आमचे सैन्य पूर्णपणे सज्ज आहे असा थेट इशारा इस्रायलचे लष्करप्रमुख जनरल अयाल झमीर यांनी म्हटले आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित

उत्तमर कमानमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जनरल झमीर यांनी इस्रायल(Israel) ची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, आमचे सैन्य हल्ल्यासाठी सज्ज असून, गरज पडल्यास इराणविरोधात नवी लष्करी मोहिम सुरु केली जाईल. इराणची लष्करी आणि नौदल ताकद जास्तीत जास्त कमकुवत करणे याचा हेतू असल्याचे झमीर यांनी स्पष्ट केले.

अणु करारावर आक्षेप

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इराणमध्ये शांतता करार घडवून आणण्यासाठी चर्चांना वेग आला आहे. यासाठी राजनैतिक पातळीवर पडद्यामागे हालचाली सुरु आहेत. परंतु दोन्ही देशांमध्ये अणु करारावर मतभेद काय आहे. अशा परिस्थिती इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी इराणच्या अणु कार्यक्रमावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे की, कोणताही करार करण्यापूर्वी इराणची आण्विक क्षमता नष्ट करणे महत्त्वाचे आहे. इराणचा युरेनियम संवर्धन तातडीने बंद केला जावा. तसेच त्यांच्याकडे असलेली अण्वस्त्रे देशाबाहेर हलवली जावीत असे त्यांनी म्हटले. यावर ट्रम्प सहमत असल्याचेही सांगितले. इराणकडे कोणताही अणुबॉम्ब नसावा असे नेतन्याहूंनी ठणकावून सांगितले आहे.

जागतिक परिणाम

सध्या इस्रायलच्या या हस्तक्षेपाने अमेरिका (America) इराणमधील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना धक्का पोहचू शकतो. इस्रायलच्या आक्रमक भूमिकेमुळे वाद पुन्हा चिघळू शकतो. याशिवाय हिजबुल्लाह आणि इराण (Iran) या दोन्ही आघाड्यांवर सध्या इस्रायलने आपली उपस्थिती वाढवली आहे. यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा स्फोटक बनण्याची शक्यता आहे.

Trump Iran Uranium : इराण उद्ध्वस्त होणार? युरेनियम संवर्धानाबाबत दिला थेट इशारा; होर्मुझवरही आक्रमक भूमिका

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलच्या लष्करप्रमुखांनी इराणल काय इशारा दिला आहे?

    Ans: अमेरिका-इस्रायल शांतता चर्चेदरम्यान इस्रायलचे लष्कर प्रमुख अयाल झमीर यांवी इराणविरोधात पुन्हा मोठ्या लष्करी कारवाईची धमकी दिली आहे.

  • Que: इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत नेतन्याहूंनी काय भूमिका मांडली?

    Ans: ट्रम्प यांच्याशी संवादादरम्यान इस्रायलचे पंतप्रधानांनी इराणची आण्विक क्षमता पूर्णपणे नष्ट करण्याचे स्पष्ट केले आहे. देशातील युरेनियम संवर्धन दुसऱ्या देशाकडे सोपवावा. त्याच्याकडे कोणताही अणु बॉम्ब नसावा असे स्पष्ट सांगितले आहे.

Web Title: Israel warns iran of military action amid us iran peace talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Iran Israel Conflict
  • World news

संबंधित बातम्या

Gaza War : ‘नेतान्याहू मानवतेचे शत्रू’; तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांचा घणाघात
1

Gaza War : ‘नेतान्याहू मानवतेचे शत्रू’; तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांचा घणाघात

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
2

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
3

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
4

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.