Israel Yemen War : '...याची मोठी किंमत मोजावी लागेल' ; इस्रायलच्या हल्ल्यांना हुथींचे प्रत्युत्तर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Yemen Houthi’s Attack On Israel : जेरुसेलम : इकडे इराणसोबतचा तणाव निवळत असताना इस्रायलने हुथींविरोधात मोठी कारवा सुरु केली आहे. परंतु इस्रायलला हुथींविरोधात कारवाई करणे महागात पडले आहे. इस्रायलने रविवारी (६ जुलै) केलेल्या हल्ल्यानंतर हुथींनी देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरु केली आहे. हुथींनी इस्रायलच्या शहरांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.
यामध्ये इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळाला पुन्हा लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे विमानव्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच इस्रायलच्या अश्कलॉनमधील वीज प्रकल्पांवर देखील हुथींनी हल्ले केले आहेत. यामुळे अमेरिकेला देखील मोठा धक्का बसला आहे. तसेच अमेरिकेने तातडीने इस्रायलला पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली आणि हवाई संरक्षण प्रणालींचा पुरवठा केला आहे.
इस्रायलने येमेनच्या तीन बंदरावरील हुथींच्या ठिकाणांना लक्ष्य केले होते. यामध्ये हुदयदाह, रास इसा आणि सैफावर हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांना हुथींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. हुथींनी इस्रायलवर ११ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षावर केला आहे. यामध्ये इस्रायलच्या अनेक भागांना लक्ष्य करण्यात आले आहे.
येमेनच्या हुथीं बंडखोरांचे प्रवक्ते याह्या सारी यांनी इस्रायलला कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना हाणून पाडण्यात आले आहे. तसेच याह्या यांनी दावा केला आहे की, येमेनमधील अनेक शहारांना इस्रायल लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आमच्या सैन्याने त्यांना माघार घेण्यास भाग पाडले आहे.
हुथींनी इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळ, अश्दोदा बंद आणि अश्कलॉनमधील विद्युत केंद्रावर हल्ला केला आहे. यासाठी हापरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आहे. तसेच हुथींनी इस्रायलला गाझातून माघार घेण्यास सांगितले आहे. हुथींनी इस्रायलने हमासवर हल्ला केल्यास तसेच येमेनमधील त्यांच्या ठिकाणांना पुन्हा लक्ष्य केल्यास याची मोठी किंमत इस्रायलला मोजावी लागेल असे हुथींनी म्हटले आहे. तसेच त्यांनी केलेले हल्ले हे पॅलेस्टिनी लोकांचे रक्षण करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.
याच वेळी इस्रायलने. हुथीं बंडखोर इस्रायलविरोधी दहशतवादी योजना आखत असल्याचे म्हटले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इस्राली सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. इस्रायलविरोधी कोणत्याही कारवाईला सहन केले जाणार नाही असे इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले होते.