इस्रायली राष्ट्रपती आयझॅक हर्झोग (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्रायली राष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे कडकत सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरुन हर्झोग यांचा हा दौरा होत आहे. सिडनी हल्ल्यात मृत पावलेल्या पीडीतांच्या स्मरणार्थ होणाऱ्या कार्यक्रमासाठी इस्रायलचे राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आले आहे. हर्झोग ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर-जनरल आणि पंतप्रधान अँथनी अल्बानीज, ज्यु समुदयाच्या नेत्यांसह सामुदायिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
पण हर्झोग यांच्या या भेटीमुळे ऑस्ट्रेलियाच्या राजकारणात वाद पेटल आहे. काही विरोधी पक्षांनी आणि व्यक्तींनी हर्झोग यांच्या भेटीचा तीव्र निषेध केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनबेरा आणि मेलबर्नसह हर्गोझ यांच्या निषेधात निदर्शनांच्या नियोजन माहिती समोर आली आहे. सोमवारी संध्या शहराच्या मध्यभागी रॅली आणि मोर्चा देखील आयोजित आहे. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियातील ज्यू समुदायाने एक पत्र जारी करुन त्यांचे स्वागत केले आहे.
गेल्या वर्षी १४ डिसेंबर २०२५ रोजी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील बोंडी बीचवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात यहुदी समुदायाला लक्ष्य करण्यात आले होते. यहुदींच्या उत्सावादरम्यान हा हल्ल्या झाला होता. यामध्ये १६ जणांचा मृत्यू, तर ४० जखमी झाले होते. या हल्ल्याला इस्लामिक स्टेटच्या विचासरणीने प्रेरित कृत्य मानले गेते. यामध्ये दोन पाकिस्तान हल्लेखोरांचा समावेश होता. याचा इस्रायलने तीव्र विरोध केला होता.
इस्रायली राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांची ही भेट ज्यू समुदायाच्या एकतेचे प्रतीक आहे. ज्यु समुदायाला पाठिंबा आणि धैर्य देण्याचा याचा हेतू आहे. सध्या डिसेंबर २०२५ मध्ये घडलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हर्झोग यांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. न्यू साउथ वेल्स राज्यात ३,००० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
Ans: इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरुन बोंडी बीच हल्ल्यात मृत पावलेल्या पीडीतांच्या स्मरणार्थ होणाऱ्या कार्यक्रमासाठी आले आहेत.
Ans: इस्रायली राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांची ही भेट ज्यू समुदायाच्या एकतेचे प्रतीक आहे. ज्यु समुदायाला पाठिंबा आणि धैर्य देण्याचा याचा हेतू आहे.






