फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सना: इस्त्रायली सैन्याने येमेनच्या एका महत्त्वाच्या विमानतळावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO)प्रमुख टेड्रोस अधानोम आणि इतर अनेक अधिकारी थोडक्यात बचावले. या हल्ल्यामुळे संयुक्त राष्ट्रंमध्ये रोष निर्माण झाला आहे. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला , जेव्हा सुमारे 300 प्रवाशांना घेऊन असैन्य “एयरबस 320” विमान लँड होत होते. याचवेळी संयुक्त राष्ट्रांचे एक प्रतिनिधीमंडळ त्या विमानतळावर उपस्थित होते.
हल्ल्यांमुळे गंभीर नुकसान
येमेनमधील मानवीय कामाचे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अधिकारी जूलियन हार्नेइस यांनी या हल्ल्याबद्दल माहिती दिली. हार्नेइस यांनी म्हटले की, या हल्ल्याचा सर्वात चिंताजनक भाग हा होता की हवाईतळावर नियंत्रण टॉवर नष्ट झाले, तेव्हा विमानतळावर ‘यमेनिया एयरवेज’ चे एक विमान उतरत होते. येमेनच्या राजधानी सना येथील अंतरराष्ट्रीय हवाईतळावर या हल्ल्यामुळे विशेषतः “VIP लाऊंज” आणि इतर काही भागांमध्ये गंभीर नुकसान झाले आहे.
VIP लाऊंज च्या 600 मीटर पर्यंत नुकसान
या लाउंजमध्ये डब्ल्यूएचओ चे प्रमुख टेड्रोस अधानोम उपस्थित होते, तसेच अनेक संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी इथेच होते. सुदैवाने, या हल्ल्याच्या दरम्यान विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले गेले. हार्नेइस यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक हल्ला ‘वीआयपी लाउंज’च्या सुमारे 300 मीटर दक्षिणेस आणि दुसरा 300 मीटर उत्तरेस झाला. हल्ल्याच्या वेळेस संयुक्त राष्ट्रांचे पाच सदस्य इमारतीच्या बाहेर होते.
इस्त्रायलवर संयुक्त राष्ट्रांची गंभीर टिका
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यात तीन जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये संयुक्त राष्ट्र मानवीय हवाई सेवा विमानाच्या चालक दलाचा एक सदस्य देखील होता, जो सना येथून बाहेर जाणार्या प्रतिनिधीमंडळाचे सदस्य घेऊन जात होता. जेरुसलेममधील या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रंने इस्त्रायलवर गंभीर टीका केली आहे आणि हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा धोक्यात येण्याची चिंता व्यक्त केली आहे. हल्ल्याच्या संदर्भात इस्त्रायलने अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
इस्त्रायलचे अनेक आघाड्यांवर युद्ध सुरु
इस्त्रायल सेना सध्या विविध मोर्च्यांवर लढत आहे. इस्त्रायली सैन्याचे एकीकडे गाझा आणि लेबनॉनमध्ये हमास व हिजबुल्लाह या दहशतवादी गटांवविरोधात इस्त्रायलचे युद्ध सुरु आहे. तिसऱ्या बाजूल इस्त्रायल सीरियामध्ये बंडखोरांविरोधात मोठी भूमिका बजावत आहे. दरम्यान इस्त्रायलने येमेनमधील हुथी बंडखोरांवरही हल्ले केले आहेत. इस्त्रायल इराण समर्थित हूथी गटाला लक्ष्य करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून इस्रायल आणि हूथींमध्ये संघर्ष सुरू आहे.