एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला दिला धक्का; संपूर्ण देश संतापला, म्हटले 'आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे.' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
S Jaishankar Slams Pakistan Army : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात, दहशतवाद आणि सीमा सुरक्षा हे विषय नेहमीच तणावाचे कारण ठरले आहेत. मात्र, रविवारी (७ डिसेंबर २०२५) भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानच्या लष्करावर थेट हल्ला चढवल्यानंतर हा तणाव शिगेला पोहोचला आहे. जयशंकर यांनी हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिटमध्ये स्पष्टपणे सांगितले की, “पाकिस्तानमधील लष्कर दहशतवादी गटांना पाठिंबा देते, ज्यामुळे त्यांच्या देशात आणि परिसरात अनेक समस्या उद्भवतात.” पुढे बोलताना त्यांनी ‘चांगले आणि वाईट दहशतवादी’ या संकल्पनेप्रमाणे, ‘चांगले लष्करी नेते’ देखील असतात, पण काही फारसे चांगले नसतात, असे सूचक विधान केले. हे विधान त्यांनी पाकिस्तानचे सध्याचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या संदर्भात केले असावे, असा कयास राजकीय वर्तुळात लावला जात आहे.
जयशंकर यांच्या या थेट विधानावर पाकिस्तानकडून अत्यंत कठोर प्रतिक्रिया आली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी जयशंकर यांच्या वक्तव्याचा पूर्णपणे निषेध (Slam) करत ते नाकारले.
ताहिर अंद्राबी म्हणाले,
“पाकिस्तान एक जबाबदार राष्ट्र आहे आणि आमचे सैन्य आणि इतर संस्था देशाच्या सुरक्षेचे मजबूत आधारस्तंभ आहेत. पाकिस्तान जयशंकर यांच्या वक्तव्यांना पूर्णपणे नकार देतो आणि त्यांना चिथावणीखोर, चुकीचे आणि बेजबाबदार मानतो.”
अंद्राबी यांनी भारतावर पाकिस्तानचे नेतृत्व आणि सरकारी संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China च्या ‘ग्रेट फायरवॉल’मध्ये तडे! अभिनेता ‘AlanYu’च्या मृत्यूमुळे सरकारची credibility धोक्यात; MAC अहवालात धक्कादायक दावा
जयशंकर आणि पाकिस्तान यांच्यातील हा नवा वाद भारत आणि पाकिस्तानमधील मे महिन्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे. मे महिन्यात भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले होते.
Jaishankar’s Sharp Warning: Pak Army Threat Real, India Ready to Strike Back! 🇮🇳⚔️ – At HTLS 2025, EAM S Jaishankar says most India problems, like terror, come from Pakistan Army under chief Asim Munir.
– He calls Munir “not-so-good” leader, like bad terrorists, but India won’t… pic.twitter.com/GC1225kWQP — Voice Of Bharat 🇮🇳🌍 (@Kunal_Mechrules) December 6, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MBS : रियाधमध्ये दारूच्या दुकानांसमोर रांगा; क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रुढीवादी सौदी अरेबियाची ‘ती’ भिंत पाडली
ताहिर अंद्राबी यांनी मे महिन्यातील संघर्षाचा उल्लेख करत धमकी दिली. त्या म्हणाल्या की पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही हल्ल्याला प्रभावीपणे, शिस्तबद्धपणे आणि जबाबदारीने प्रत्युत्तर देण्याची क्षमता दाखवली आहे. त्यांनी हे विधान पाकिस्तानच्या संरक्षण क्षमतेचे उदाहरण म्हणून उद्धृत केले. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये झालेले F-16 विमानांचे नुकसान पाकिस्तानसाठी अजूनही एक नाजूक आणि लाजिरवाणा विषय आहे. जयशंकर यांच्या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वावर आणि त्यांच्या दहशतवादी गटांना असलेल्या कथित पाठिंब्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
Ans: पाकिस्तानच्या अनेक समस्यांचे मूळ त्यांचे लष्कर (Army) आहे.
Ans: चिथावणीखोर, चुकीचे आणि बेजबाबदार.
Ans: 'ऑपरेशन सिंदूर', ज्यात पाकिस्तानी विमानांचे नुकसान झाले.






