वॉशिंग्टन : अंतराळाबाबत अनेकांना विशेष आकर्षण असतं. त्यासाठी अनेक प्रयत्नही असतात. अंतराळात पाणी सर्वात गरजेचा घटक आहे. अंतराळात पाण्याची भेट म्हणजे जीवनाची भेट असेच आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून (International Space Station) एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये शास्त्रज्ञांनी एका पद्धतीने 98 टक्के पाणी पुनर्संचयित (Urine and Sweat) केले आहे.
स्पेस स्टेशनवरील प्रत्येक अंतराळवीराला पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी आणि साफसफाईसाठी दररोज एक गॅलन पाणी आवश्यक आहे. अंतराळवीरांनी ECLSS चा भाग असलेल्या प्रणालींचा वापर केला. ECLSS म्हणजे पर्यावरण नियंत्रण आणि लाइफ सपोर्ट सिस्टीम ज्याचे उद्दिष्ट अंतराळात पुढील वापरासाठी अन्न, हवा आणि पाणी यासारख्या गोष्टींचा पुनर्वापर करणे आहे, याबाबतचे वृत्त Space.com ने जारी केले आहे.
श्वास आणि घामाच्या आर्द्रतेतून काढले पाणी
ECLSS बनवणाऱ्या हार्डवेअरमध्ये पाणी पुनर्प्राप्ती प्रणाली समाविष्ट असते, जी सांडपाणी गोळा करते आणि ते पिण्यायोग्य पाणी तयार करणाऱ्या वॉटर प्रोसेसर असेंबलीकडे (WPS) पाठवते. केबिन क्रूच्या श्वासोच्छ्वास आणि घामाद्वारे केबिन हवेतून बाहेर पडणारा ओलावा कॅप्चर करण्यासाठी प्रगत डिह्युमिडिफायर वापरला जातो.
लघवीत आढळले 98 टक्के शुद्ध पाणी
या प्रक्रियेचे उप-उत्पादन म्हणून खारट पदार्थाची निर्मिती केली जाते. ज्यामधून सांडपाणी काढून टाकण्यासाठी ब्राइन प्रोसेसर असेंबली (BPA) UPA मध्ये जोडली जाते. जॉन्सन स्पेस सेंटर टीमचा भाग असलेल्या क्रिस्टोफर ब्राउन यांनी सांगितले की, बीपीएने मूत्रातून काढलेल्या स्वच्छ पाण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवरून 98 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे.