कोरोनाचा NB.1.8.1 व्हेरिएंट बनलाय आणखी धोकादायक; WHO ने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
आशियात पुन्हा एकदा कोविड-१९ च्या नव्या लाटेने डोके वर काढले असून, हाँगकाँग आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य नागरिकांच्या कमी होत चाललेल्या रोगप्रतिकारक क्षमतेचा परिणाम असू शकतो, त्यामुळे लसीकरण पूर्ण करणे आणि बूस्टर डोस घेण्याचं आवाहन, अधिकाऱ्यांनी केलं आहे. कोरोना महामारीतून जग आता कुठे सावरलं असून आशिया खंडात पुन्हा कोरोनाची लाट आल्यामुळे भीतीचं वातावरण आहे.
चेहरा अचानक काळा पडू लागलाय… तर मग सावध! ही 5 कारणे असू शकतात कारणीभूत
ब्लूमबर्गने वृत्त दिले आहे की, हाँगकाँग आणि सिंगापूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी आशियाच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून नवी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनमधील कम्युनिकेबल डिसीज ब्रँचचे प्रमुख अल्बर्ट औ यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, शहरात कोविड-१९ ची प्रकरणे वाढत आहेत. गंभीर प्रकरणे आणि मृत्यूची संख्या त्यांच्या शिखर पातळीवर पोहोचली आहे, ३ मे पर्यंतच्या आठवड्यात ३१ प्रकरणे नोंदवली गेली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
सिंगापूरमधील आरोग्य मंत्रालयाने जवळपास एका वर्षानंतर मे महिन्यात कोविड प्रकरणांवर अपडेट दिले. ३ मे ला सिंगापूरमध्ये कोविड रुग्णांची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत २८% ने वाढून सुमारे १४,२०० वर पोहोचली. त्याच कालावधीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा सुमारे ३०% ने वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही वाढ रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे असू शकते. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या व्हायरसच्या नव्या स्ट्रेन्समुळे संसर्ग अधिक घातक होत असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं म्हटलं आहे.
फक्त हाँगकाँग आणि सिंगापूर नव्हे, तर संपूर्ण आशियामध्ये मागील काही महिन्यांपासून कोविड-१९ ची लाट अधूनमधून येत आहेत. यामध्ये चीन, थायलंड यांसारख्या देशांनाही याचा फटका बसला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनमध्ये सध्या नवीन लाट उद्भवत आहे. मे ४ पर्यंतच्या पाच आठवड्यांमध्ये तिथे कोविड टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट दुपटीहून अधिक झाला आहे. थायलंडच्या रोग नियंत्रण विभागानुसार, यावर्षी दोन मोठे कोविड उद्रेक झाले असून, एप्रिल महिन्यात पार पडलेल्या सोंगक्रान सणानंतर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
उन्हाळ्याच्या काळात इतर श्वसनविषयक विषाणू कमी होतात, पण कोविड-१९ चा संसर्ग मात्र याच काळात वाढत असल्याने या विषाणूची संसर्गक्षमता अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होते. आरोग्य यंत्रणांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण, आणि इतर उच्च धोका गटातील लोकांना बूस्टर डोस लवकरात लवकर घेण्याचे आवाहन केले आहे. हाँगकाँगचा लोकप्रिय गायक ईसन चॅन याला कोविड झाल्याने त्याला तैवानमधील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलावे लागले, अशी माहिती त्याच्या अधिकृत Weibo खात्यावरून देण्यात आली.