'युद्ध नको, आम्हाला तेल हवे!' पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी उडवली अमेरिकेची खिल्ली; इराणने ट्रम्प यांची १५-कलमी योजना फेटाळली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Khawaja Asif statement on US Iran war : मध्य-पूर्वेतील युद्धाची (US-Israel Iran War) धग आता केवळ रणांगणापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती आता शब्दांच्या युद्धात रूपांतरित झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसमोर शांततेचा ‘१५-कलमी’ प्रस्ताव ठेवला खरा, पण या प्रस्तावावरून आता पाकिस्तानने अमेरिकेची जाहीर फजिती केली आहे. दुसरीकडे, इराणनेही या अटी फेटाळून लावत अमेरिकेला आरसा दाखवला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी आहे ते म्हणजे ‘तेल’ आणि जगाची सर्वात महत्त्वाची नस असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’.
पाकिस्तानला सहसा अमेरिकेचा मित्र मानले जाते, पण यावेळी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी वॉशिंग्टनच्या बदलत्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली आहे. आसिफ यांच्या मते, अमेरिकेचा शांतता प्रस्ताव हा जगाच्या कल्याणासाठी नसून केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आहे. त्यांनी म्हटले की, “अमेरिकेला आता लोकशाही किंवा युद्धाचा अंत यात रस नाही, तर त्यांना फक्त होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणारे स्वस्त तेल हवे आहे.” अमेरिकेची ही ‘तेल-नीती’ आता जगासमोर उघडी पडली असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट
होर्मुझची सामुद्रधुनी हा असा जलमार्ग आहे जिथून जगातील २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र, इराणने या मार्गावर आपला ‘होल्ड’ इतका घट्ट केला आहे की, जागतिक व्यापार अक्षरशः कोलमडला आहे. ‘लॉयड्स लिस्ट’च्या आकडेवारीनुसार, या मार्गावरून दररोज सरासरी १२० जहाजे प्रवास करतात. पण १ ते २५ मार्च २०२६ या काळात या मार्गावरून केवळ १५५ जहाजे गेली आहेत. म्हणजेच व्यापारात तब्बल ९५ टक्क्यांची ऐतिहासिक घट झाली आहे. हीच ती बाब आहे ज्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था हादरली असून ट्रम्प यांना घाईघाईने शांतता प्रस्ताव मांडावा लागला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेल्या १५-कलमी प्रस्तावात इराणच्या अणुकार्यक्रमावर बंदी आणि होर्मुझ खुले करण्याच्या अटी होत्या. पण इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत स्वतःच्या अटी मांडल्या आहेत. इराणचे म्हणणे आहे की, “जर शांतता हवी असेल तर आधी युद्धातील नुकसानीची भरपाई द्या, आमच्या नेत्यांच्या हत्या थांबवण्याचे लेखी आश्वासन द्या आणि होर्मुझवर इराणचेच नियंत्रण राहील हे मान्य करा.” इराणच्या या ठाम भूमिकेमुळे अमेरिकेची शांती योजना प्राथमिक स्तरावरच अडकली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait of Hormuz: मोठा दिलासा! अखेर इराणने होर्मुझचं दार उघडलं; भारत आणि ‘या’ देशांना LPG आणि Oil नेण्यासाठी फ्री एन्ट्री
सध्याची परिस्थिती पाहता, अमेरिका युद्ध लवकरात लवकर संपवण्यासाठी उतावीळ आहे, कारण तेलाच्या वाढत्या किमती ट्रम्प यांच्यासाठी देशांतर्गत डोकेदुखी ठरत आहेत. मात्र, इराण आता पूर्णपणे आक्रमक झाला असून तो कोणत्याही दबावाखाली वाकण्यास तयार नाही. पाकिस्तानसारख्या देशाने उघडपणे अमेरिकेची खिल्ली उडवणे हे दर्शवते की, जागतिक राजकारणात अमेरिकेचा प्रभाव कमी होत असून इराणचा ‘ऑईल गेंम’ यशस्वी होत आहे.
Ans: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, अमेरिकेला युद्ध थांबवण्यात रस नाही, तर त्यांना फक्त इराणने रोखलेले तेल हवे आहे.
Ans: इराणच्या नाकेबंदीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीत ९५ टक्क्यांची मोठी घट झाली आहे.
Ans: इराणच्या मते अमेरिकेच्या अटी एकतर्फी आहेत. इराणला युद्धाच्या नुकसानीची भरपाई आणि आपल्या नेत्यांच्या सुरक्षेचे लेखी आश्वासन हवे आहे.






