फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जालिंदरनाथ बारा वर्षांचे झाल्यावर त्यांनी गृहत्याग केला. त्यानंतर रानावनात भ्रमण करताना त्या जंगलाला आग लागली तेव्हा जालिंदरनाथ पळू लागले. त्यावेळी जालिंदर नाथांवर अग्निदेवांचं लक्ष गेलं आणि पिता पुत्रांची भेट झाली. या नंतर अग्निदेवांनी दत्तगुरुंकडे जालिंदरनाथांना नेलं आणि योगविद्या देण्याची विनंती केली. आगीनदेवांच्या विनंती मान्य करत दत्तगुरूंनी जालिंदरनाथांना दीक्षा दिली सर्व मंत्र योग विद्येचं शिक्षण दिल. जालिंदरनाथ हे कानिफनाथ यांचे गुरू. जालिंदर नाथांची समाधी बीड जिल्ह्यात आहे. नाथ संप्रदायात जालिंदर नाथांना अग्निपुत्र चैतन्य जालिंदर नाथ असं म्हटलं जातं.
या तेजस्वी योगीच्या जन्माविषयी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार, असंही म्हटलं जातं की, एकदा भगवान शिव ध्यान मग्न होते. त्या वेळी त्यांच्या शरीरातून एक तेजस्वी दिव्य ज्योत प्रकट झाली. ही ज्योत पृथ्वीवर पडली आणि त्यातून एका बालकाचा जन्म झाला, तोच पुढे जालिंदरनाथ म्हणून ओळखला गेला. त्यामुळे जालिंदरनाथांना महादेवांचा अवतार देखील मानलं जातं. तर अजून एका दंतकथेनुसार असं सांगण्यात येत की, एक राजा होता त्याला मुलबाळ नव्हतं. म्हणून या राजाने मबहादेवांची कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन महादेवांनी त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला.
काही काळानंतर त्या राजाच्या घरी जालिंदरनाथांचा जन्म झाला. असं सांगितलं जातं. त्यामुळे जालिंदरनाथांमध्ये लहानपणापासूनच विलक्षण बुद्धिमत्ता होती. आध्यात्मामध्ये त्यांना पहिल्यापासून ओढ होती.पुढे त्यांनी घर-संसाराचा त्याग करून योगसाधनेचा मार्ग स्वीकारला. पुढे जालिंदरनाथांना मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहवासात त्यांनी उच्च कोटीचे योगज्ञान प्राप्त केले.जालिंदरनाथांनी संपूर्ण आयुष्य अध्यात्मिक मार्गाने लोककल्याणासाठी वाहिलंआणि नाथ संप्रदायाचा प्रसार केला अशीही दंतकथा सांगितली जाते.






