फूड डिलिव्हरी बॉयच्या (Food Delivery Boy) बॅगमध्ये 800 वर्ष जुनी गर्लफ्रेंड? असं काही ऐकलं की आपल्याला आश्चर्य वाटणारच ना! पण हा प्रकार काही चित्रपटातील रहस्यमय कथानकाचा भाग नसुन प्रत्यक्षात घडलेला प्रकार आहे. पेरूमध्ये एका 26 वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयच्या बॅगमधून 800 वर्षे जुनी ममी (Mummy) सापडली आहे. पोलिसांनी या ममीबाबत चौकशी केली असता फूड डिलिव्हरी बॉयने धक्कादायक बाब सांगितली. तो म्हणाला की ती माझी आध्यात्मिक गर्लफ्रेंडआहे. (Spiritual Girlfriend) सध्या पोलिसांनी ममी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पेरुव्हियन पोलिसांनी मंगळवारी 26 वर्षीय ज्युलिओ सीझर बर्मेजो या युवकाला ताब्यात घेतले आहे.
[read_also content=”ग्रीसमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना! मालगाडीची पॅसेंजर ट्रेनला धडक; 26 जणांचा मृत्यू 85 हून अधिक जखमी https://www.navarashtra.com/world/26-dead-and-over-85-injured-in-train-accident-in-greec-enrps-373172.html”]
ज्युलिओ सीझर बर्मेजो हा युवक एका फूड डिलिव्हरी कंपनीत काम करतो. पोलिसांनी त्याच्या बॅगेतून सुमारे 600 ते 800 वर्षे जुना ममी (मानवी सांगाडा) जप्त केला. ममी त्याच बॅगमध्ये होती ज्यामध्ये ज्युलिओ लोकांच्या घरी अन्न पोहोचवण्याच काम करतो. पोलिसांच्या चौकशीत त्याने मात्र काही आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या. त्याच्या वडिलांनी 30 वर्षांपूर्वी कोणाकडून तरी ही ममी विकत घेऊन घरी आणल्याचा दावा केला होता. फूड डिलिव्हरी बॉयने त्याचे नाव ‘जुआनिटा’ ठेवले. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये ज्युलिओ असे म्हणताना दिसत आहे की, जुआनिता (मम्मी) माझ्या खोलीत माझ्यासोबत घरी राहते. ती माझ्यासोबत झोपते आणि मी तिची काळजी घेतो. ती माझी आध्यात्मिक प्रेयसी आहे. तो त्याच्या मित्रांना दाखवणार होता.
या मुद्द्यावर पेरूच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे वक्तव्य आले आहे. मंत्रालयाने सांगितले की प्री-हिस्पॅनिक अवशेष ‘ममीफाईड प्रौढ पुरुष’ होता. जो बहुधा पुनोच्या पूर्वेकडील प्रदेशातील असावा. मंत्रालयातील एका तज्ज्ञाने सांगितले, ‘ही मामी जुआनिता नसून ती जुआन आहे. हा सांगाडा असलेल्या व्यक्तीचे वय किमान ४५ वर्षे होते. ते पट्टीने गुंडाळलेले होते. ‘ममी केलेले अवशेष संरक्षण आणि संवर्धनाच्या उद्देशाने ताब्यात घेण्यात आले आहेत अशी माहीती सांस्कृतिक मंत्रालयाने दिली.