नेपाळनंतर आता 'या' देशाचेही सरकार कोसळणार? सरकारविरोधी हजारो लोक रस्त्यावर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Philippines Protest : मनिला : गेल्या काही दिवसांत जगभरातील अनेक देशांमध्ये वादाची ठिणगी उभारत आहे. नेपाळ, फ्रान्स, ब्रिटन नंतर आता फिलिपन्समध्येही भ्रष्ट सरकारविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. लोकांनी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. याच वेळी फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी लोकांना शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनियर राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी जुलैमध्ये २०२५ मध्ये आपल्या राष्ट्रीय भाषणात देशातील भ्रष्टाचार घोटाळ्यांचा उल्लेख केला होता. शिवाय नुकत्याच झालेल्या संसदीय सुनावणी दरम्यान कॉंग्रेसच्या अनेक खासदार आणि आमदारांवर, सरकारी इंजिनियर्सवर बांधकाम कंपन्यांकडून लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.
पोलिस आणि लष्कराला अलर्ट राहण्याचा आदेश
यामुळे देशात भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधात छोट्या छोट्या शांततापूर्ण रॅली काढण्यास सुरुवात झाली होती. कॅथोलिक नेते, व्यावसायिक अधिकारी आणि निवृत्त जनरल अशा अनेक नेत्यांनी या रॅलींवर संताप व्यक्त केला होता. यामुळे २१ सप्टेंबर रोजी लोकांनी राजधानी मनिला येथे निषेधाची योजना आखली होती. याची माहिती मिळताच देशात पोलिसांना आणि लष्करांना सतर्क करण्यात आले आहे.
राष्ट्रपतींचा निदर्शकांना पाठिंबा
दरम्यान सोमवारी (१५ सप्टेंबर) राष्ट्रपती मार्कोस यांनी भ्रष्टाचारा विरोधात निषेध करणाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी राष्ट्रपती नसतो तर निदर्शकांमध्ये सामील असतो. निदर्शकांकजून जबाबादरीची मागणी स्वत: मार्कोस यांनी केली आहे. तसेच त्यांनी जनतेला विश्वास दिला आहे की, भ्रष्टाचारात सामील असलेल्या प्रत्येक व्यक्तीची कठोर चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. मग ती व्यक्ती कोणी राजकीय नेता असो किंवा जवळचा सहकारी असो. पण त्यांनी शांततापूर्ण निदर्शने काढण्याचे आवाहन केले आहे. याच वेळी कम्युनिकेशन्स सेक्रेटरी क्लेअर कॅस्ट्रो यांनी म्हटले आहे की, सरकार अस्थिर करु इच्छित असलेले लोक निदर्शकांच्या रागाचा फायदा उचलण्याती शक्यता आहे.
फिलिपिन्स सरकावर गेल्या तीन वर्षात पूर नियंत्रण प्रकल्पांतील ९.६ अब्ज डॉलर्स चोरल्याचा आरोप अनेक खासदार, आमदारवर लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकांच्या मते, प्रकल्पांच्या खर्चासाठीचे पैसे लोकांनी चोरले आहेत. याच वेळी सरकारने २०२६ साठी पूर नियंत्रण प्रकल्पातील पैसे शिक्षण, आरोग्य आणि शेतीसाठी वापरणार असल्याची घोषणा केली आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
फिलिपिन्समध्ये का सुरु आहेत निदर्शने?
फिलिपिन्समध्ये पूर नियंत्रण प्रकल्पांमध्ये सरकारच्या कथित भ्रष्टाचारा आणि लाकचोरीविरोधात तीव्र निदर्शने सुरु आहेत.
सरकारवर फिलिपिन्स नागरिकांनी काय आरोप केला आहे?
सरकारवर पूर नियंत्रित प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप असून गेल्या ३ वर्षात ५४५ अब्ज पेसो म्हणजे ९.३ अब्ज डॉलर्स चोरीचा आरोप आहे.
निदर्शकांची काय आहे मागणी?
निदर्शकांनी सरकारमधील भ्रष्टाचारासाठी जबाबादार असलेल्या लोकांवर कारवाईची मागणी केली आहे.
सोशल मीडियावरील बंदीने हजारो Gen Z चा चढला पारा; नेपाळमध्ये संचार बंदी लागू