फोटो - सोशल मीडिया
सिंगापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय सिंगापूर दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या सिंगापूर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यामुळे भारत-सिंगापूर मैत्री वाढवणे, ‘सामरिक भागीदारी’ अधिक दृढ करणे आणि आग्नेय आशियाई देशातून गुंतवणूक आकर्षित करणे, अशी तीन प्रमुख उदिष्ट्य आहेत. ब्रुनेई देशाचा दौरा केल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे सिंगापूर दौऱ्यावर गेले आहेत. त्यांचे सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी जंगी स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंगापूरमध्ये पोहचताच त्यांचे तेथे राहणाऱ्या भारतीयांना मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केले. यावेळी हजारो भारतीय नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उभे होते. यावेळी पारंपरिक वेशभूषा करत नागरिक दुतर्फा उभे राहिले होते. नरेंद्र मोदींचे आगनम होताच एकच मोदी मोदी असा नारा देण्यात आला. मोदींच्या नावाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. त्याचबरोबर ढोल ताशा पथकांने महाराष्ट्रीयन वाद्य वाजवत नरेंद्र मोदींचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी ढोल वाजवण्याचा मोह नरेंद्र मोदी यांना रहावला नाही. नरेंद्र मोदी यांनी देखील सिंगापूरमध्ये ढोल वादन केले. यावेळी त्यांच्यामधील जोष अभूतपूर्व होता.
#WATCH | Prime Minister Narendra Modi tries his hands on a dhol. Members of the Indian diaspora welcomed PM Modi on his arrival in Singapore. pic.twitter.com/JBWG5Bnrzk
— ANI (@ANI) September 4, 2024
पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी भारतीयांनी केसरी शाल देत स्वागत केले. त्याचबरोबर उपस्थित महिलांना नरेंद्र मोदी यांना सिंगापूरमध्ये राखी देखील बांधली आहे. सिंगापूरमधील आनंदी भारतीय समुदायाने पंतप्रधान मोदी हॉटेलमध्ये पोहताच स्वागत केले. यावेळी त्यांची काही क्षणचित्रं असलेले पोस्टर देखील भारतीय घेऊन उभे होते. त्यांचा हा उत्साह पाहून नरेंद्र मोदी यांचा आनंद देखील द्विगुणीत झाला होता.
#WATCH | A woman ties rakhi to Prime Minister Narendra Modi as he arrives at a hotel in Singapore. Members of the Indian diaspora welcomed PM Modi on his arrival in Singapore. pic.twitter.com/ZgiUsOxa46
— ANI (@ANI) September 4, 2024
सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदींनी हा दौरा केला आहे. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी सिंगापूरच्या नेतृत्वाच्या तीन पिढ्यांशी संपर्क साधतील, अशी माहिती नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच पंतप्रधान मोदींचे सिंगापूरच्या संसद भवनात अधिकृत स्वागत करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षणमुगररत्नम यांची भेट घेणार आहेत. यावेळी भारत आणि सिंगापूर यांच्यातील संबंधाविषयी सकारात्मक चर्चा होणार आहे.