चीन-रशियाचा चंद्रावर अणुउर्जा प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षरी; अमेरिकेला टाकणार मागे? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: रशिया आणि चीनमध्ये दिवसेंदिवस मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होत आहे. यामुळे अमेरिकेच्या चिंतेत वाढ होत आहे. दरम्यान चीन आणि रशियामध्ये एक मोठा करार करण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेची आणखी चिंता वाढली आहे. चीन आणि रशियामध्ये चंद्रावर अणु उर्जा केंद्र बांधण्याचा करार करण्यात आला आहे. यामुळे जागतिक स्तरावर अंतराळ शर्यतीत चीन आणि रशियासाठी नवी दिशा मिळेल. हा प्रकल्प २०३६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन्ही देशांची याबाबत सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाची अंतराळ संस्था आणि चीनचे राष्ट्रीय अंतराळ प्रशासनेने या करारावर स्वाक्षरी केली आहे. रशियाच्या अंतराळ संस्था रोसकॉसमॉसने दिलेल्या माहितीनुसार, चीन आणि रशियाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवासाठी कायमस्वरुपी तळ बांधण्याचा तसेच ILRS ला वीज पुरवठा करण्यासाठी हा करार केला आहे. चीन आणि रशियामध्ये अणुउर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार (Mou) करण्यात आला आहे.
२०१७ मध्ये ILRS ची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये व्हेनेझुएला, बेलारुस, अझबैजान, दक्षिम आफ्रिका, इजिप्त, निकारग्वा, थायलंड, सर्बिया. पाकिस्तान सेनेगसल आणि कझाकिस्तान या देशांचा समावेश आहे. ILRS चे केंद्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून १०० किलोमीटर अंतरावर असणार आहे. या अणुउर्जा प्रकल्पाचे बांधका २०३० ते २०३५ च्या दरम्यान सुरु करण्यात येणार आहे.
चीन आणि रशियाची योजना दोन्ही देशांतील वाढत्या अंतराळ संबंधाचे प्रतीक मानले जात आहे. हा करार अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा, अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने चंद्राच्या कक्षीय तळावरील योजना रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे. चीन आणि रशियाचा हा प्रकल्प यशस्वी झाल्यास यामध्ये अमेरिकन अंतराळ संस्था नासा मागे पडण्याची शक्यता आहे.
रशियाची अंतराळ संस्था रोसकॉसमॉसचे प्रमुख युरी बोरिसोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन आणि रशियाने अणुउर्जेवर चालणारे कार्गो स्पेसशिप देखील तयार करत आहे. यासाठी दोन्ही देशांच्या अंतराळ संस्था गेल्या वर्षापासून एकत्र कार्यकरत आहेत.
गेल्या काही दशकात चीनने आपले अंतराळ प्रकल्प पुढे नेले आहेत. २०१३ मध्ये चीनने चांगई-३ मोहीमेंतर्गत आपले पिहले चंर्द रोव्हर चंद्रावर उतरवले होते. त्यानंतर चीनने मंगळावरही रोव्हर्स पाठवले. तेसच चीनने चांग-ई-८ मोहीमी देखील सुरु केली आहे. याचा उद्दिष्ट चिनी अंतराळवीरांना चंद्रावर पोहोचवणे आहे. सध्या चीन अवकाश संशोधन मोहीमंमध्ये जागतिक स्तरावर आपले स्थान मजहूत करण्याचा प्रयत्न करत आहे.