"जर युरोपला युद्ध हवे असेल तर रशियाला..." पुतिन यांना राग अनावर दिली 'अशी' धमकी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
१) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपला थेट आणि कठोर इशारा दिला आहे.
२) अमेरिकेच्या शांतता योजनेत युरोपने केलेले बदल हे शांतता प्रक्रिया बिघडवण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप पुतिन यांनी केला आहे.
३) जर युरोपने युद्धाचा मार्ग स्वीकारला, तर रशिया पूर्ण तयारीनिशी त्याला सामोरा जाण्यास सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Vladimir Putin Big Warning : मंगळवारी (दि. 2 डिसेंबर 2025) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेन (Ukraine) युद्धासंदर्भात युरोपला दिलेला इशारा जगभरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेसोबत होऊ घातलेल्या शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी ठाम भूमिका मांडत सांगितले की, “रशिया युरोपविरुद्ध युद्धाची योजना आखत नाही, मात्र जर युरोपला युद्ध हवे असेल आणि ते सुरू झाले, तर रशिया त्यासाठी पूर्णपणे तयार आहे.” त्यांच्या या विधानामुळे सध्या सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत आणखी गंभीरता निर्माण झाली आहे.
पुतिन यांनी युरोपियन नेत्यांवर गंभीर आरोप करत म्हटले की, युक्रेन युद्ध शांततेने संपवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना मुद्दाम अडथळा आणण्याचे काम युरोप करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने युक्रेन युद्ध संपवण्यासाठी २८ कलमी मसुदा सादर केला होता. मात्र कीव आणि युरोपातील काही देशांनी या मसुद्यावर आक्षेप घेतल्यानंतर त्यात बदल करण्यात आले. पुतिन यांच्या मते, हे बदल मुद्दाम करण्यात आले असून त्यांचा एकमेव उद्देश म्हणजे शांतता प्रक्रिया थांबवणे आणि रशियावर अस्वीकार्य अटी लादणे हा आहे.
पुतिन यांचे हे विधान त्या वेळेस आले जेव्हा अमेरिकेच्या शिष्टमंडळातील प्रमुख सदस्य, राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर, मॉस्कोमध्ये उच्चस्तरीय चर्चेसाठी उपस्थित होते. अनेक दिवसांच्या कूटनीतिक हालचालीनंतर या भेटींना वेग आला असून, युद्ध थांबवण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल मानले जात आहे. मात्र युरोपची भूमिका आणि त्यांचा हस्तक्षेप हे या प्रक्रियेसाठी मोठे आव्हान बनत असल्याचे रशियाचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हिमालयाचे अस्तित्व अन् भारताचा विनाश’, ‘हे’ एकच कारण ठरणार प्रचंड विध्वंसक; BISच्या भूकंप नकाशामुळे 75% लोकसंख्या धोक्यात
पुतिन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “युरोपीय नेत्यांकडे शांततेचा कोणताही अजेंडा नाही. त्यांना युद्धच हवे आहे आणि त्यामुळेच ते अमेरिकेच्या प्रयत्नांना अडथळा आणत आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे केवळ युक्रेन युद्धापुरतेच नव्हे तर युरोप-रशिया संबंधांवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. अनेक विश्लेषकांच्या मते, ही केवळ चेतावणी नसून भविष्यातील मोठ्या संघर्षाचा संकेतही असू शकते.
putin said that “if Europe suddenly wants to go to war with russia – we’re ready immediately,” adding that it wouldn’t be “like with Ukraine,” but a real war after which “there may be no one left to negotiate with.” pic.twitter.com/0QP2SP9fNl — Yevhen (@YevhenPronin) December 2, 2025
credit : social media and Twitter
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता योजनेला उघड पाठिंबा दिला आहे. त्यांना विश्वास आहे की हा प्रस्ताव युद्ध समाप्तीसाठी प्रभावी ठरू शकतो. मात्र युरोपीय देशांची भीती अशी आहे की, या योजनेमुळे युक्रेनला रशियाच्या अटी मान्य करण्यास भाग पाडले जाऊ शकते. त्यामुळेच युरोप सावध भूमिका घेत आहे, तर रशिया तीच भूमिका “युद्धखोर” असल्याचे सांगत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Politics : इस्रायल पुन्हा राजकीय वादाच्या भोवऱ्यात; PM Netanyahu यांची काळे कारनामे लपवण्यासाठी धडपड, 111 पानांचा प्रस्ताव
एकंदर पाहता, युक्रेन युद्धाच्या भवितव्यावर ही स्थिती अत्यंत निर्णायक ठरत आहे. पुतिन यांचा कडक इशारा, अमेरिकेची सक्रियता आणि युरोपची विरोधी भूमिका यामुळे पुढील काही दिवसांत जागतिक राजकारणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. शांतता येणार की संघर्ष वाढणार, हे येणारा काळच ठरवेल; पण सध्या जगाचे लक्ष मॉस्को, वॉशिंग्टन आणि ब्रसेल्सकडे लागून राहिले आहे.
Ans: जर युरोपने युद्ध लादले, तर रशिया पूर्ण तयारीत आहे, असा कडक इशारा दिला.
Ans: मॉस्कोमध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यात उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे.
Ans: वाढत्या तणावामुळे आणि कडक भूमिकेमुळे संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






