अमेरिकेत गोळीबाराच्या (America Firing News) घटना काही केल्या थांबताना दिसून येत नाही आहे. वारंवांर येथे गोळीबाराच्या घटना घडत असतात. आता टेक्सासमधील अॅलन येथील अॅलन प्रीमियम आउटलेट्स मॉलमध्ये अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर गोळीबार करणारा हल्लोखोरही ठार झाल्याची माहिती आहे.
[read_also content=”खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाडची पाकिस्तानात हत्या! सोसायटीमध्ये घुसून हल्लेखोरांनी केला गोळीबार https://www.navarashtra.com/world/khalistani-terrorist-paramjit-singh-panjwad-killed-in-pakistan-the-assailants-entered-the-society-and-opened-fire-nrps-395634.html”]
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅलन प्रीमियम आउटलेट्स डॅलसच्या उत्तरेकडील एक आउटडोअर मॉल आहे. न्यू यॉर्क टाईम्सने ब्रेसन जोन्स या प्रत्यक्षदर्शीनी सांगितल की, तो स्टोरटच्या आउटलेट स्टोअरमध्ये काम करण्यासाठी पोहोचला होता मात्र, कारमधून उतरताना त्याला 20 हून अधिक राऊंड गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर त्याला लोक दुकानातून बाहेर पळताना दिसले. तो पुढे म्हणाले की, एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या कारकडे धावत आला आणि त्याला दरवाजे उघडण्यास सांगितले आणि त्यानंतर ते दोघेही तेथून पळून गेले.
या घटनेनंतर परिसारात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून लोकांना गोळीबाराच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. शेरीफच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की अद्याप मॉलमध्ये काही पीडित आहेत. मात्र, त्यांच्या स्थितीबद्दल माहीती होऊ शकलेलं नाही.
शहराचे पोलिस प्रमुख ब्रायन हार्वे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हल्लेखोर बंदूकधारी एकटाच होता, त्याने अचानक गोळीबार सुरू केला. मात्र, नंतर पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला गोळ्या घालून ठार केले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शेकडो पोलिस कर्मचाऱ्यांनी पहारा देत हात वर करून लोक मॉलमधून बाहेर पडताना दिसले.