लंडन : चारचाकी कारमध्ये एक जोडपं बसलं होतं. पण तेव्हा त्यांना गाडीतून कसला तरी आवाज (Car Sound) आला. या आवाजानंतर जोडप्याने लगेच याची माहिती घेतली. पहिल्यांदा त्यांना इंजिनमध्ये बिघाड झाला असावा असं वाटलं. पण जेव्हा त्यांनी गाडी तपासली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण, चारचाकी कारच्या आतून एक भलामोठा साप (Snake Found in Car) बाहेर आला.
इंग्लंडमधील ग्लुसेस्टरशायर येथील ही घटना आहे. सायरा अहमद नावाच्या महिलेला कारच्या इंजिनमधून काही आवाज ऐकू येऊ लागला. सायरा आणि तिचा जोडीदार जस्टिन श्मिट्झ यांना सुरुवातीला वाटले की त्यांच्या कारमध्ये काहीतरी बिघाड झाला असेल पण जेव्हा त्यांनी अधिक माहिती घेत पाहिले असता गाडीत साप भलामोठा साप असल्याचे आढळले. हा साप तब्बल अडीच फूट कॉर्न स्नेक होता. त्याला पाहून दोघेही अत्यंत भयभीत झाले.
सर्पमित्राला बोलावून सापाला काढले बाहेर
या भल्यामोठ्या सापाला पाहून दोघांनाही काही कळाले नाही. पण त्यांनी तातडीने हालचाल करत सर्पमित्राला बोलावले. सर्पमित्र आल्यानंतर त्याने लगेच या सापाला गाडीतून बाहेर काढले. या सर्वाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.