दक्षिण आफ्रिकेत परदेशी नागरिकांविरोधात हिंसाचार; ३० जूनची Deadline ठरत आहे Death Warrant? काय आहे प्रकरण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
धक्कादायक बाब म्हणजे, अनेक शहरांमध्ये आफ्रिकी लोक हातात काठ्या, ढाली घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी स्थानिक नागरिक परदेशी नागरिकांची कागदपत्रे तपासत असून त्यांना घरांमध्ये आणि ऑफिसमधून बाहेर काढले जात आहे. सोशल मीडियावर स्थानिक नागरिक काठ्या घेऊ फिरत असल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडे मोझांबिकच्या दोन आणि मलावीच्या एका नागरिकाची हत्या करण्यात आली होती. यानंतरी ही परिस्थिती उद्धभवली असल्याचे सांगितले जात आहे. सध्या भीतीपोटी हजारो स्थलांतरितांनी तात्पुरत्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.
स्थानिक नागरिकांनी परदेशी नागरिकांमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप केला आहे. परदेशी नागरिक स्थानिक लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. यामुळे स्थलांतरितांनी देश सोडण्याची मागणी लोकांनी केली आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेत सुमारे ३३ टक्के बेरोजगारी आहे. तसेच देशाला आर्थिक मंदीचाही सामना करावा लागत आहे. यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष वाढत असून परदेशी नागिरकांना लक्ष्य केले जात आहे.
South Africa is braced for nationwide anti-illegal migrants protests on Tuesday June 30th – a deadline set by civil rights activists demanding undocumented foreigners to leave the country by the 30th of June. The gov byt has fully rejected the shutdown and deployed heavily. pic.twitter.com/Fhy4IDDfkV — Kenya News Centre🇰🇪 (@KenyaNewsCentre) June 30, 2026
सध्या नागरिकांमधील वाढता रोष पाहता स्थलांतरितांच्या सुरक्षेसाठी ३० जूनची मुदत लक्षात घेऊन सरकारने संवेदनशील भागात कडक बंदोबस्त केला आहे. २०२१ सारख्या दंगलीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी सरकार सतर्क झाले आहे. सरकारने नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. झिम्बाब्वे, मलावी, नायजेरिया, घाना, आणि इतर काही आफ्रिकी देशात आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी देखील सरकारने उपाययोजना केल्या आहेत.
Anti-immigrant tensions are escalating in South Africa as the June 30 deadline set by Operation Dudula approaches. Daily protest marches are intensifying in Tembisa, while several African countries have already begun evacuating their nationals amid fears that demonstrations… pic.twitter.com/qtXPOJLlcs — Africalix (@Africa_lix) June 29, 2026
India China border dispute : सीमेवर चीनची नवी चाल? अरुणाचलमध्ये भारतीय जमिनीवर कब्जा केल्याचा दावा






