India Pakistan Conflict : भारताने UNSC पाकिस्तानची बोलती केली बंद; दहशतवादावर भर सभेत सर्जिकल स्ट्राईक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानच्या प्रतनिधींनी भारताच्या पाकिस्तानवरील लष्करी कारवाईवर द्वेषपूर्ण विधाने केली होती. भारताने ही विधाने खोटे आणि स्वार्थी असल्याचे स्पष्ट केले आहे. भारताने पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत या हल्ल्यात २६ निरापराध लोकांचा बळी घेतला असल्याचे सांगितले. हा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी देण्यामुळे झाला असल्याचे सांगितले.
UNSC मध्ये बोलताना पी. हरीश यांनी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवर भाष्य करत देशाच्या संविधानात २७ व्या घटनादुरुस्तीद्वारे लष्कराला संरक्षण दिले असल्याचे म्हटले. ही कृती पाकिस्तानच्या लोकशाही व्यवस्थेला धोका पोहोचवणारी असल्याचे पी. हरीश यांनी ठासून सांगितले.
याच वेळी पी. हरीश यांनी पाकिस्तानला दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिली. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात आणि दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलत नाही तोपर्यंत पाकिस्तानच्या धोरणांवर आणि दाव्यांवर विश्वास ठेवू नये. भारताने हेही स्पष्ट केले की, दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करणे योग्य नाही. भारताच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्याचे स्पष्ट केले. याशिवाय पी. हरीश यांनी भारत नेहमीच पाकिस्तानच्या दहशतवादी आणि धोकादायक भूमिकेविरोधात कारवाई करत राहिले असे स्पष्ट केले.
India advises Pakistan to introspect about the rule of law at UNSC. Raises questions on the 27th amendment under which the Pakistani military engineered a “constitutional coup”. Statement by @IndiaUNNewYork @AmbHarishP pic.twitter.com/R7HjdGX2le — Sidhant Sibal (@sidhant) January 27, 2026
पाकिस्तानची बोलती बंद! UNSC च्या बैठकीत हल्ल्याबाबत एकाही प्रश्नाचे देता आले नाही उत्तर
Ans: भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी पाकिस्तानवर दहशतवाद्यांना समर्थन करणे, खोटा प्रपोगंडा पसरवणे आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
Ans: भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्या धोरणावर आणि दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Ans: भारताने दहशतवादाला अवैध ठरवले असून याविरोधात आपल्या नागरिकांचे रक्षण करत राहिल असे म्हटले आहे.






