Sunita Williams Education: भारतीय वंशाच्या सुनीता विल्मसने गाजवले अंतराळ! जाणून घ्या शिक्षण अन् करिअरचा पूर्ण प्रवास(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अतंराळवीर बुच विल्मोर 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परते आहे. गेल्या वर्षी 5 जून रोजी दोन्ही अंतराळवीर बोईंग स्टारलाइनरच्या कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात आठ दिवासांच्या मोहिमेवर गेल्या होते. मात्र, बोईंगच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या हा आठ दिवसांचा प्रवास लांबणीवर पडला. यादरम्यान दोन्ही अंतराळवीरांनी महत्त्वरपूर्ण प्रकल्पांवर कार्य केले. तसेच त्यांना सुरक्षितपण परत आणण्यासाठी NASA एलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीसोबत मिळून कार्य करत होते. अखेर SpaceX चे फाल्कन-9 रॉकेटद्वारे त्यांना परत आणण्यात आले.
पण तुम्हाला माहित आहे सुनीता विल्यम्स अंतराळवीर कशा बनल्या, त्यांनी कोणती अंतराळवीर बनण्यासाठी कोणती डिग्री घेतली आहे. तर आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता लिन विल्यम्स यांनी अंतराळात सुनी आणि स्लोव्हेनियात म्हणून ओळखण्यात येते. सुनीता विल्यम्स अंतराळवीर होण्यापूर्वी युनाडेट स्टेटमध्ये नेव्ही अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. अंतराळवीर झाल्यानंतर विल्यम्स यांनी नेक अंतराळवीर मोहिंमासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS)वर आपला वेळ घालवला. 5 जून 2024 रोजी विल्यम्स एका मोहिमेसाठी ISS वर गेल्या होत्या. सुनीता विल्यम्स यांच्या नावावर सर्वात जास्त काळ अंतराळ यात्रा करणाऱ्या महिलेचा विक्रम आहे.
भारताशी संबंध काय ?
सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या मूळचे गुजरातच्या अहमदाबादमधल्या मेहसाना जिल्ह्यातील झुलासन गावचे रहिवाशी होते. दीपक पांड्या यांनी आपले वैद्यकीय शिक्षण अहमदाबादमध्ये पूर्ण केले. दीपक यांचे भाऊ नवीन अमेरिकेत होते. नंतर दिपक पांड्या देखील अमेरिकेत गेले आणि वैद्यकीय क्षेत्रात आपली सेवा बजावली. दिपक पांडयां यांना यादरम्यान बोनी झोलोकर यांच्याशी त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
पुढे दोघांनी लग्न केले आणि दीपक पांड्या अमेरिकेतच स्थायिक झाले. दीपक आणि बोनी यांना जय, दिना आणि सुनीता अशी तीन मुले झाली. 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेच्या ओहियोमध्ये सुनिता यांचा जन्म झाला आहे. सुनिता सर्वांमध्ये लहान होत्या. दीपक हिंदू आणि आई कॅथलिक असल्याने घरात संमिश्र वातावरण आणि सर्व धर्मांप्रती आदर करण्याची शिकवण त्यांना लहानपणापासूनच मिळाली आहे.
सुनीता विल्यम्स यांचे शिक्षण
सुनीता विल्यम्स यांनी 1983 मध्ये नीडहॅम हायस्कूलमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. नंतर त्यांनी 1987 मध्ये विल्यम्स युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमीमधून भौतिकशास्त्रात विज्ञान पदवी मिळवली. 1995 मध्ये विल्यम्स यांनी फ्लोरिडा येथे इनस्टिस्टूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली. त्यानंतर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स 1987 मध्ये अमेरिकेच्या नौदलात सामील झाल्या. तिथे त्यांनी बराच काळ आपल्या सेवेचे योगदान दिले.
बेसिक डायव्हिंग ऑफिसर आणि नेव्हल एअर ट्रेनिंग
सुनीता विल्यम्स यांनी नेव्हल कोस्टल अकादमीमध्ये सहा महिन्यानंतर त्यांची बेसिक डायव्हिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि काही काळानंतर त्यांना नेव्हल एअर ट्रेनिंग कमांडमध्ये सेवा देण्याची संधी प्राप्त झाली. 1989 मध्ये त्यांना नेव्हल एव्हिएटर म्हणून नोकरी मिळाली.
अवकाश विज्ञान आणि नासामधील करिअर
नंतर जून 1989 मध्ये सुनीता विल्यम्स यांची अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी रशियन अंतराळात संस्थेतून आपल्या अंतराळवीराचा पहिला प्रवास सुरु केला. नंतर 2006 मध्ये त्यांनी पहिले अंंतरिक्ष उड्डाण केले. 2012 मध्ये सुनीताने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर मोहिमा करण्यासाठी नासासोबत आपला प्रवास सुरू केला.