• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Trfs Falcon Squad Claimed To Be Behind Pahalgam Attack

पहलगाम हल्ल्यामागे TRFचे ‘फाल्कन स्क्वॉड’ असल्याचा दावा; भविष्यात काश्मीरसाठी बनू शकते डोकेदुखी

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील शांततामय आणि रमणीय पहलगाम परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित झाला आहे. नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 23, 2025 | 12:57 PM
TRF's Falcon Squad claimed to be behind Pahalgam attack

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ला, टीआरएफच्या ‘फाल्कन स्क्वॉड’ने देशाला पुन्हा हादरवले, २६ निष्पापांचे बळी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शांततामय आणि रमणीय पहलगाम परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित झाला आहे. नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या भयावह हल्ल्याची जबाबदारी ‘टीआरएफ’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. विशेष म्हणजे, ‘फाल्कन स्क्वॉड’ या संघटनेच्या विशेष पथकाने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे.

‘फाल्कन स्क्वॉड’, दहशतीचा गरुड

टीआरएफ म्हणजे ‘द रेझिस्टन्स फ्रंट’, ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी निगडीत आहे. काश्मीरमध्ये अस्थिरता पसरवणे हे यांचे प्रमुख उद्दिष्ट असून, अनेक वेळा सामान्य नागरिकांवर व सुरक्षादलांवर हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्याची भीषणता आणखी वाढवणारा भाग म्हणजे टीआरएफचे ‘फाल्कन स्क्वॉड’ हे विशेष पथक. या पथकाचे नावच त्यांच्या कार्यपद्धतीचे प्रतीक आहे. ‘फाल्कन’ म्हणजे गरुड – झपाट्याने झडप घालणारा आणि तेवढ्याच चपळाईने निघून जाणारा पक्षी. हे पथकही त्याच धर्तीवर काम करते – पाच ते दहा मिनिटांत हल्ला करून तत्काळ परिसर सोडून देणे, ही त्यांची खासियत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानला ‘बालाकोट 2.0’ ची भीती; भारतीय सीमेवर AEW&C विमानांची तैनाती, हाय अलर्ट घोषित

हल्ल्याची रचना आणि उद्देश

पहलगाम हल्ला अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता. टार्गेट स्पष्ट होते – सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे आणि काश्मीरमधील शांततेच्या प्रयत्नांना तडा देणे. गोळीबारात २६ नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये महिला, वृद्ध आणि काही पर्यटकांचाही समावेश होता. हल्ल्याच्या प्रकारावरून हे स्पष्ट होते की फाल्कन स्क्वॉडचे प्रशिक्षित दहशतवादी अचूक माहिती आणि योजनांसह काम करत होते. त्यांनी अत्यल्प वेळेत हल्ला करून कुठलेही ठोस पुरावे मागे न ठेवता पळ काढला.

The level of shamelessness from the people we are trying to have a peaceful neighbourhood Right after the attack lashar-e-taibas group The resistance front TRF made a video claiming the attack, they killed people asking their religion if they were Hindus #PahalgamTerroristAttack pic.twitter.com/eZoGlcCm4x — 𝑷𝑨𝑩𝑳𝑶 𝑬𝑺𝑪𝑶𝑩𝑨𝑹 𝕏 (@hoosier_ddaddyy) April 22, 2025

credit : social media

राष्ट्रीय सुरक्षा दलांची जोरदार मोहीम

या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर, राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने फाल्कन स्क्वॉडच्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ड्रोन निरीक्षण, गुप्तचर माहिती आणि स्थानिक सहकार्य यांच्या आधारावर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षादलांचे एकच उद्दिष्ट – या गरुडाच्या पंखांना छाटणे आणि टीआरएफच्या हल्ल्यांवर कायमचा आघात करणे.

फाल्कन स्क्वॉड, एक धोकादायक दहशतवादी धोरण

विशेषज्ञांच्या मते, फाल्कन स्क्वॉड हे टीआरएफचे ‘एलिट’ दस्ते आहेत, जे विशेष प्रशिक्षण घेतलेले असून, सीमापारून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी धोरणांचा भाग आहेत. यांची कामगिरी ही अधिक प्रचंड मानसिक परिणाम घडवून आणण्याची असते – जिथे कमी वेळेत जास्त भीती निर्माण होते. हे दस्ते हल्ला करून नष्ट न होता निसटतात, त्यामुळे यांचा शोध घेणे अधिक कठीण ठरते. अतिशय हलक्या वजनाचे हत्यार, विशिष्ट कोड वागणूक, स्थानिकांमध्ये मिसळण्याची क्षमता यामुळे हे दस्ते अत्यंत धोकादायक मानले जातात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : LAC वर ड्रॅगनची मोठी तयारी; सॅटेलाईट इमेजेसमुळे भारताचा तणाव आणखी वाढला

शांततेसाठी भारताचा निर्धार

या भीषण हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारने काश्मीरमधील सुरक्षेची पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले असून, शांतता भंग करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याचा नाश करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर, देशाची एकात्मता आणि शौर्य पुन्हा एकदा पुढे येईल यात शंका नाही. पहलगाममधील हल्ला हे केवळ एक अपप्रयत्न आहे – पण भारताचा निर्धार आणि सैन्याची तयारी, या गरुडाचा शेवट लवकरच होईल, अशी देशवासियांची ठाम अपेक्षा आहे.

Web Title: Trfs falcon squad claimed to be behind pahalgam attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • Jammu Kashimir
  • Pahalgam Terror Attack
  • Pahalgam Terrorist Attack

संबंधित बातम्या

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर
1

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर

‘अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवाद पसरवू नका’ ; भारताने पुन्हा UN मध्ये पाकिस्तानला फटकारले
2

‘अफगाणिस्तानच्या नावाखाली दहशतवाद पसरवू नका’ ; भारताने पुन्हा UN मध्ये पाकिस्तानला फटकारले

Pakistani spy News: भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर
3

Pakistani spy News: भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर

Modi-Sharif UN Meeting : संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मोदी-शरीफ येणार आमनेसामने; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच वेळ
4

Modi-Sharif UN Meeting : संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मोदी-शरीफ येणार आमनेसामने; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच वेळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

Zodiac Sign: सिद्धिदात्रीच्या आशीर्वादाने तयार होत आहे धन योगाचा शुभ संयोग, या राशीच्या लोकांना होणार मालमत्तेमध्ये लाभ

Zodiac Sign: सिद्धिदात्रीच्या आशीर्वादाने तयार होत आहे धन योगाचा शुभ संयोग, या राशीच्या लोकांना होणार मालमत्तेमध्ये लाभ

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अभिषेकासाठी गंगाजलाचा वापर; नव्या वादाची ठिणगी

गूढ आवाजाने पुन्हा एकदा पैठण हादरले; तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

गूढ आवाजाने पुन्हा एकदा पैठण हादरले; तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ

नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.