भारतीय फार्मा सेक्टरला अमेरिकेचा झटका; ट्रम्प यांचा टॅरिफ सवलती रद्द करण्याचा इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या मनमानी कारभारामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. जगभरात व्यापार युद्ध सुरु झाले आहे. याच दरम्यान चीनवर देखील अतिरिक्त कर लादल 104% कर लागू केला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी फार्मास्यूटिकल कंपन्यांना दिलेली सवलत लवकरच संपेल असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फटाका सर्वात जास्त भारताला बसण्याची शक्यता आहे. कारण भारत मोठ्या प्रमाणात औषधे निर्यात करतो.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (08 एप्रिल) घोषणा केली आहे की, अमेरिका लवकरच फार्मास्यूटिकल कंपन्यांवर मोठे शुल्क लागू करणार आहे.
जागतिक घडामो़डी संबंधित बातम्या- अमेरिकेचा चीनवर 104% टॅरिफचा घणाघात; चीन म्हणाला, माघार घेणार नाही…
ट्रम्प यांच्या हा निर्णय अशा वेळी आहे जेव्हा, गेल्या आठवड्यापासून ट्रम्प यांनी भारतावर लादलेला 26% परस्पर शुल्क लागू करण्यात आला आहे. भारत आपल्या औषधनिर्मितीपैकी 31.5% निर्याता अमेरिकेला करतो. शिवाय, चीनवरही 104% नवीन कर लागू केला आहे. वॉशिंग्टन नॅशन रिपब्लिकन कमिटीच्या भाषणात हा निर्णया जाहीर करताना चीनचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु भारताचा कोणताही उल्लेख नव्हता. यामुळे फार्मास्यूटिकल कर नेमका कोणत्या देशावर लागू होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, दरवाढीनंतर, सर्व औषध कंपन्या देशाच्या भागात कारखाने सुरु करतील.. ट्रम्प यांनी परस्पर कराची घोषमा कतेल्यानंतर औषधनिर्मिती, तांबेव, सेमीकंडक्टर, लाकूड, सोने. उर्जा आणि काही खनिजे जी अमेरिकेसाठी उपयुक्त आहेत ती करमुक्त करण्यात आली होती. फार्मास्यूटिकल कंपन्यांना करातून सवलत मिळाली होती कारण अमेरिका औषधे मोठ्या प्रमाणात आयात करतो. विशेष करुन भारतातून येणार जेनेरिक मेडिसिन्स, अमेरिकेच्या आरोग्यसेवा व्यवस्थेत खर्च कमी ठेवण्यास मदत करतात.
सध्या भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापारावर चर्चा करत आहे. यामुळे टॅरिफचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवा आणि डेटा विश्लेषण कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फार्मास्यूटिकल कंपन्यांवरील सवलत रद्द झाल्यास यामुळे व्यापारात आणखी गोंधळ उडेल. यामुळे जागतिक व्यापारात मंदीची भिती वाढेल.
सध्या अमेरिका अनेक देशांशा करारावर वाटाघाटी करण्याच्या प्रक्रियेवर भर देत आहे. अनेक जपान, बांगलादेश, व्हिएतनाम वाटाघाटी करण्यास तयार झाले असून चीनने मात्र कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास नकार दिला आहे. यामुळे ट्रम्प यांनी चिडून चीनवर अतिरिक्त 50% कर वाढवत 104% कर लागू केला आहे. ट्रम्प यांच्या हेकेकोरपणा आणि मनमानी कारभारामुळे पुन्हा एकदा बिकट परस्थिती निर्माण झाली आहे.