अमेरिकेचा चीनवर 104% टॅरिफचा घणाघात; चीन म्हणाला, माघार नाही... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: चीन आणि अमेरिकेतील व्यापार तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनवरील 34% टॅरिफमुळे चीननेही अमेरिकन उत्पादनांवार तितकाच कर लागू केला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसमोर वाटाघाटीचा प्रस्ताव मांडला होता. परंतु चीनने कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी असाही अल्टीमेट दिला होता की, कोणत्याही देशाने प्रत्युत्तर दाखल अमेरिकवर कर लादल्यास त्यांच्यावर पुन्हा नवीन कर आकारण्यात येईल.
ट्रम्प यांच्या या धमकीनंतर लगलेलच दुसऱ्या दिवशी ट्रम्प प्रशासनाने चीनवर 104% आयात शुल्क लागू केल्याची घोषणा केली. 9 एप्रिलपासून हे शुल्क लागू होणार असून अमेरिकेच्या या निर्णयाकडे दोन्ही देशांमधील आर्थिक युद्धची नवी सुरुवात म्हणून पाहिले जात आहे.
🚨Karoline Leavitt: “It was a mistake for China to retaliate. When America is punched, he punches back harder. That’s why there will be 104% tariffs going into effect on China tonight at midnight.”
LFG💪🔥 pic.twitter.com/ATFEJ0Z3cA
— Derrick Evans (@DerrickEvans4WV) April 8, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, चीनने अमेरिकन उत्पादनांवरील लागू केलेला 34% कर मागे न घेतल्यास आम्ही त्यांच्यावर अतिरिक्त 50% शुल्क लागू करु. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीनंतर व्हाईट हाऊसने दुसऱ्या दिवशी 104% शुल्काची घोषणी प्रत्यक्षात आणली.
ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, अमेरिकेविरुद्ध प्रत्युतुतर देणाऱ्या प्रत्येक देशावर तात्काळ नवीन आणि कठोर शुल्क लागू केले जाईल. त्यांनी हेही म्हटले की, आम्ही आदीच स्पष्ट करत आहोत, अमेरिका व्यपारात कोणताही पद्धतीचा अन्या सहन करणार नाही. यामुळे चीनने आता आपल्या धोरमाचा पुनर्विचार करण्याची आणि अमेरिकेशी योग्य वर्तन करण्याची वेळ आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केले आहे की, दोन्ही देशांतील चर्चा आता पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या अमेरिका चर्चेची विनंती केलेल्या देशांशी बैठका घेत आहे. वाटाघाटी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
अमेरिका-चीन तणाव वाढणार?
दरम्यान जागतिक अर्थ तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवरील कर वाढवण्याचा निर्णय जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करु शकतो. शिवाय यामुळे चीन आणि अमेरिकेतील तणाव आणखी ताणला जाण्याची शक्यता आहे.
चीनने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला बॅल्कमेलिंग म्हणून संबोधले आहे. चीनने ट्रम्प यांच्या निर्णायाला तीव्र विरोध केला असून या व्यापर युद्धावर शेवटपर्यंत लढवण्याची तयारी दर्शवली आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर यांच्या झालेल्या चर्चेदरम्यान चीनने पंतप्रधान ली केकियांनी यांनी, त्यांच्या देश कोणत्याही नकारात्मक धमक्क्यांचा सामाना करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या 50% अतिरिक्त करांतरही चीनची आर्थिक वाढ सुरु राहिल.