फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बेरूत: हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्त्रायल सातत्याने लेबनॉनला प्रत्युत्तर देत आहे. 7 ऑक्टोबरच्या रात्री हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या तेल अवीव आणि उत्तरी समुदायांवर रॉकेट्स डागले होते. या हल्ल्यांचे प्रत्युत्तर आज इस्त्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या भूमिगत स्थानांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि बॉम्बफेक केले आहेत. आत्तापर्यंत इस्त्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या लष्करी कारवाईत हिजबुल्लाहचे फार नुकसान झाले आहेत. आता इस्त्रायली लष्कराने आणखी एक हल्ला केला आहे.
नेतन्याहू काय म्हणाले
मिळालेल्या माहितीनुसार इस्त्रायलने लेबनॉनमधील नागरी संरक्षण केंद्रावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये 5 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार गेल्या 24 तासांमध्ये इस्त्रायली लष्कराने हमास आणि हिजबुल्लाहच्या 230 हून अधिक ठाकाणांना लक्ष्य केले आहे. इस्त्रायलच्या लष्कराने लेबनॉनमधील अनेक लॉंच पॅड देखील नष्ट केले आहेत. याबाबत इस्त्रायलचे इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्यीहू यांनी म्हटले आहे की, आम्ही हिजबुल्लाहच्या अनेक प्रमुखांचा खात्मा करून त्यांचे सैन्य कमकुवत केले आहे.
Five paramedics killed in Israeli airstrike on a civil defence centre in southern Lebanon, officials say, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) October 9, 2024
याशिवाय, हिजबुल्लाहच्या वासरदार हसन नसराल्लाह तसेच त्याचा उत्तरअधिकारी हसन शफिद्दीनला देखील टार केले आहे. नेतान्याहू यांनी लेबनॉनच्या लोकांना संबोधित केले आणि त्यांना हिजबुल्लाहपासून मुक्त होण्यास सांगितले. इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले.
इस्त्रायल इराणवर प्राणघातक हल्ला करण्याच्या तयारीत
दरम्यान इस्त्रायल आता उराणवर प्राणघातक हल्ल्याच्या तयारीमध्ये आहे. इस्त्रायल संरक्षण मंत्री गॅलांट यांनी म्हटले आहे की, इराणवर इस्त्रायचा हल्ला घातक असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि नेतन्याहू यांच्या भेटीनंतर इस्रायलच्या संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी हे विधान केले. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्लाच्या चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे त्यांनी म्हटले आहे. गॅलंटच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलच्या हल्ल्याने इराणला धक्का बसेल. कोणतीही माहिती न देता संरक्षण मंत्री म्हणाले, ‘काय घडले आणि कसे घडले ते त्यांना समजू शकणार नाही.’