फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्त्रायल सातत्याने लेबनॉनला प्रत्युत्तर देत आहे. 7 ऑक्टोबरच्या रात्री हिजबुल्लाहने इस्त्रायलच्या तेल अवीव आणि उत्तरी समुदायांवर रॉकेट्स डागले होते. या हल्ल्यांचे प्रत्युत्तर आज इस्त्रायली सैन्याने हिजबुल्लाहच्या भूमिगत स्थानांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि बॉम्बफेक केले आहेत. आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार, लेबनॉनमधील या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचे 50 दहशतवादी मारले गेले असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हे हल्ले केले असून या भीषण हवाई हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचे सहा कमांडर ढेर केले असल्याचे इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे. हिजबुल्लाहचे प्रमुख कमांडर अहमद हसन नाझल, जो बिंट जबेल क्षेत्राचा प्रभारी होता आणि इस्रायलवर हल्ले करत होता, त्याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. याशिवाय गजर सेक्टर प्रमुख हसीन तलाल कमाल, मुसा दिव बरकत, महमूद मुसा कार्निव्ह आणि बिंट जबेल सेक्टर आर्टिलरी प्रमुख अहमद इस्माईल आणि अब्दुल्ला अली डिकीक हे देखील मारले गेले. एवढेच नाही तर इस्त्रायली हवाई दलाने हिजबुल्लाहच्या नासिर, बद्र आणि अझीझ युनिटवर भीषण हल्ले केले आहेत.
हिजबुल्लाहची अनेक ठिकाणे उद्धवस्त
IDF ने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहची अनेक ठिकाणे उद्धवस्त करण्यात आली आहे. हिजबुल्लाच्या अझीझ युनिटचे 50 तळ आणि नासेर युनिटचे 30 तळ इस्त्रायलने उद्ध्वस्त केले आहेत. इ्स्त्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्हटले आहे की, आमच्या हवाई दलाच्या विमानांनी दक्षिणेकडील हिजबुल्लाहच्या भूमिगत केंद्रांवर हल्ले केले आहेत. आता उत्तरेकडील भाग देखील नष्ट करण्याची योजना आखली आहेत.
कारवाई सुरूच राहील
इस्त्रायलने दक्षिण लेबनॉनमध्येही जमिनीवर हल्ले सुरू केले आहेत.हगारी यांनी म्हटले आहे की, इस्रायली संरक्षण दल दक्षिण लेबनॉनमध्ये कारवाई सुरूच ठेवतील. हिजबुल्ला या दहशतवादी संघटना संपुष्टात आणली जाईल. उत्तरेकडील रहिवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी परत आणणे हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचे म्हटले आहे. इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, लवकरच लेबनॉनच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर कारवाई सुरू होईल. यामुळे लष्कराने भूमध्य समुद्राच्या 60 किलोमीटर परिसरातील रहिवासी आणि मच्छिमारांना किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.
इस्रायलच्या पंतप्रधानांनी हिजबुल्लाचा वरिष्ठ प्रमुख मारला गेल्याची पुष्टी केली
याशिवाय इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहच्या प्रमुख नेता हसन नसराल्लाहचा उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीन गेल्या आठवड्यात इस्त्रायली हवाई हल्ल्यात मारला गेल्याची पुष्टी केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाहचा अफवा असलेला उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीन मारला गेला आहे.