भारत-पाक तणावात वाढ; अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना दिल्या लाहोर सोडण्याच्या सुचना (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: भारताने दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊल उचलेले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केले आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान भांबरला आहे. यानंतर पाकिस्तानने भारतातीली 15 शहरांवर क्षेपणास्त्रे डागली परंतु भारताने ही क्षेपणास्त्रे हाणून पाडली आहेत. पाकिस्तानचे प्रयत्न धुळीस लावत भारताने पाकिस्तानच्या लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली देखील उखडून टाकवली आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतर अमेरिकेने लाहोरमधील आपल्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. विशेषत: लाहोरमदील नागरिकांना परिसर सोडून जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेने नागरिकांना परिसर सोडून सुरक्षित ठिकणी आश्रय घेण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या लाहोर वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना देखील सुरक्षिथ ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना ड्रोन स्फोट आणि संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित ठिकाणी जाण्याल आदेश दिले आहेत.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान चवथला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्ताने भारताच्या 15 शहरांवर हल्ला केला होता. परंतु भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले धूडकावून लावले आहेत. पाकिस्तानने जम्मू, अवंतीपोरा, अमृतसर, जालंघर आदमपूर, लुधियाना, पठाकोट, बंठिंडा आणि चंदीगडसह 15 शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. परंतु भारताने ही क्षेपणास्त्रे हाणून पाडली आहेत.
भारताच्या लष्करी दलाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, फरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये LoC वर हल्ला केला होता. परंतु पाकिस्तानचा हा हल्ला नाकाम करण्यात आला आहे.
भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 28 निरापराध लोकांचा बळी घेल्या. या भ्याड हल्ल्यानंतर देशात संतापाचे वातवरण होते. या हल्ल्यानंतर देशातून कडक कारवाईची मागणी केली जात होती. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर मिळेल असे म्हटले होते.
पहलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर भारताच्या लष्कर, नौदल, आणि हवाई दलाने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकव्यात काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उखडून टाकले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तान भारताला पोकळ धमक्या देत होता. दरम्यान भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने या कारवाईने दहशतवादी आणि दहशतवादाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या देशभरात जल्लोषाचे वातवरण आहे.