सिंदूर ऑपरेशनने पाकच्या आणले नाकीनऊ? भारताने उद्धवस्त केलेली Air Defence Radar System म्हणजे काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे नष्ट केली आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तान चवथाळला आहे. पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, फरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये LoC वर मोर्टार आणि तोफाखानांचा वापर करत हल्ला केला होता. परंतु भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमेंतर्गत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स रडार सिस्टिम पूर्णत: नष्ट केली आहे. अशी माहिती भारताच्या लष्करी दलाने दिली.
भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. हा भारताचा इलेक्ट्रिक वॉर फेअरमध्ये मोठा विजय आहे. परंतु एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय याबद्दल बहुतेक लोकांना माहित नसेल. आज आपण एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत.
एअर डिफेन्स रडार सिस्टिम ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आहे. या अत्याधुनिक प्रणालीचा वापर हवाई क्षेत्रातील हालचालींचा शोध घेण्यासाठी होतो. याचा वापर हवाई क्षेत्राचे निरीक्षण करणे, तसेच त्याचा तपशील घेण्यासाठी होती. हे आधुनिक तंत्रज्ञान देशाचे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करते. यामुळे हवाई क्षेत्राची सुरक्षा अधिक बळकट होते.
या सिस्टीमचा उपयोग या सिस्टिमुळे हावई क्षेत्रातील संशायत्मक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेता येतो, यामुळे हवाई हल्ल्यापासून संरक्षण होते. तसेच हवाई वाहतूक नियंत्रणासाठी देखील या सिस्टिमचा वापर केला जातो. यामुळे शत्रूच्या विमानाचा शोध घेणे सहज सोपे होते.
रेडिओ लहरींचा (Radio Waves) वापर- रडार सिस्टिम रेडिओ लहरी उत्पन्न करते. या उत्पन्न झालेल्या लहरी हवेतून प्रवास करतात. जर हवेत एखादे विमान, क्षेपणास्त्रे असेल तर त्याला धडकून या लहरी परत येतात. यामुळे हवाई क्षेत्रांमध्ये हालचालींचा शोध लागतो.
प्रतिध्वनींचा अभ्यास- या रेडिओ लहरी (Radio Waves) परत आल्यावर रडार सिस्टिम प्रतिध्वनींचा (धडकून आलेल्या आवाजाचा) अभ्यास करते. यामध्ये वस्तूची दिशा, स्थान, वेग, आणि उंचीबद्दल माहिती मिळते.
डेटा प्रक्रिया त्यानंतर रडार सिस्टिमला मिळालेली माहिती संगणाकाद्वारे प्रोसेस केली जाते. यामुळे संशयात्मक हवाई हालचालींबद्दल अचूक निरिक्षण करता येते आणि हल्ल्याची माहिती मिळते. माहिती मिळताच सिस्टिद्वारे अलर्ट दिला जातो आणि हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती कारवाई करता येते.
आपल्या भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये आकाश आणि बराक यांसाख्या एअर डिफेन्स रडार सिस्टिमचा वापर केला जातो. यामुळए आपल्या देशाची हवाई सुरक्षा अधिक बळकट आणि सुनिश्चित होते.