फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 2024 अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनंतर त्यांनी कमला हॅरिस यांना त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे. कमला हॅरिस यांच्या प्रवेशानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीची स्पर्धा चुरशीची झाली. जो बायडेन अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जो बायडेन यांना जबरदस्तीने या शर्यतीतून माघार घ्यावी लागली आहे. शनिवारी मिनेसोटा येथे निवडणूक रॅलीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. रॅलीत ट्रम्प यांनी याला डेमोक्रॅट्सने घडवलेले बंड म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, हे डेमोक्रॅट्सने घडवलेले बंड आहे. 14 दशलक्ष मते असलेल्या माणसासाठी हे सत्तापालट झाली आहे. ते पुढे म्हणाले, जो बायडेन यांना निवडणूक लढवायचे होते, पण त्यांना उमेदवारी देण्याची संधी देण्यात आली नाही. त्यांना डेमोक्रॅट्स पक्षाने अतिशय वाईट वागणूक दिली आहे. आम्ही या बंडखोरीला बळी पडणार नाही. ही सत्तापालट खूप महत्त्वाची आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, “फेक न्यूज म्हणत आहेत की, जो बायडेन खूप धाडसी आहेत. परंतु सत्य हे आहे की त्यांना शर्यतीतून बाहेर काढण्यात आले.” 81 वर्षीय बायडेन यांनी 20 जुलै रोजी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. यासोबतच त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या नावाला पाठिंबा दिला. अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत कमला हॅरिस डोनाल्ड ट्रम्प यांना कडवी टक्कर देत आहेत.
25 व्या घटनादूरुस्तीचा वापर
ट्रम्प म्हणाले, ” जो बायडेन यांना 25 व्या घटनादुरुस्तीची धमकी दिली आहे. ते म्हणाले की जर तुम्ही स्वत: या शर्यतीतून बाहेर पडला नाही, तर आम्ही 25 व्या घटनादुरूस्तीचा वापर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी करू. माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येनंतर, राष्ट्रपतीपदाचा उत्तराधिकार निश्चित करण्यासाठी काँग्रेसने 25वी घटनादुरुस्ती मंजूर केली होती. तसेच ही घटनादुरुस्ती उपराष्ट्रपती व इतर मंत्रिमंडळ अध्यक्षांना शारीरिकदृष्ट्या अक्षम असल्याचे आढळल्यास पदावरून दूर करण्याचा अधिकार देते.






