Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Strike Iran : दोन दिवसांत अमेरिकेचा दुसरा हल्ला; भीषण स्फोटांनी हादरले इराणचे अब्बास बंदर

US Strike Iran : एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा इराणवर प्रहार करण्यात आला आहे. अमेरिकन सैन्याने पुन्हा अब्बास बंदरावर हल्ला चढवला असून यामध्ये ग्राउंड स्टेशनला लक्ष्य करण्यात आले आहे. आत्मसंरक्षणाचा दावा करण्यात येत आहे. परंतु, यामुळे पुन्हा मध्यपूर्व पेटू शकते असे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 28, 2026 | 10:33 AM
US Strike Iran

US Strike Iran

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचा इराणवर दुसरा मोठा हल्ला
  • अब्बास बंदरावर ३ भीषण स्फोट
  • आता काय होणार?
US Strike Iran News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिकेने एकाच आठवड्यात सगल दुसऱ्यांदा इराणवर हल्ला केला आहे. बुधवारी (२७ मे) मध्यरात्रीच्या सुमारास इराणच्या अब्बास बंदरावर लष्करी तळांवर प्रहार करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून युद्ध पुन्हा पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Abraham Accord Deal : मध्यपूर्वेत ट्रम्प यांची कूटनीतिक चाल! इस्रायलशी हातमिळवणी केली,तरच…; इस्लामिक देशांना थेट इशारा

स्वसंरक्षणात्मक हल्ल्याचा हवाला

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेन सैन्याने इराणचे चार ड्रोन हवेतच हाणून पाडले आहेत. बंदर अब्बासमधील ग्राउंड स्टेशनवर हल्ला झाला आहे. अमेरिकेने स्वसंरक्षणात्मक हल्ल्याचा हवाला दिला आहे. अमेरिकन सैन्याला  या तळांपासून थेट धोका होता असे सेंट्रल कमांडच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी २६ मे रोजी देखील अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांनी इराणच्या होर्मुझमध्ये माइन्स गाडणाऱ्या दोन जहाजांवर आणि अब्बास बंदरावरील क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रावर हल्ला केला होता. त्यावेळी देखील सैनिकांच्या सुरक्षेसाठी कारवाई करण्यात आली होती असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले होते.

ट्रम्प यांचा इशारा अन्…

पहिल्या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवादादरम्यान डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी, इराणच्या अटी अमेरिकेला मान्य नसल्याचे म्हटले होते. त्यांनी इराणला इशारा दिला होता की, इराणने अमेरिकेच्या सर्व अटी मान्य न केल्यास त्यांच्यावर थेट लष्करी कारवाई केली जाईल. तसेच होर्मुझवर इराण (Iran) आणि ओमानच्या नियंत्रण खपवून घेतले जाणार नाही हेही स्पष्ट केले होते.

इराणची भूमिका

दुसरीकडे इराणने युद्धा पुन्हा भडकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांमुळे इराण त्रस्त झाला असून याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे. अमेरिकेने हल्ले थांबवले नाहीत तर इस्रायलला संपवण्याचा इशाराही इराणने दिला आहे. इराणने अमेरिकेच्या कारवाईला युद्धबंदीचे उल्लंघन संबोधले आहे.

इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरुच

दुसरीकडे इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरुच आहेत. २६ मे रोजी इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये भीषण प्रहार केला होता. ज्यामध्ये  हिजबुल्लाचे मुख्य नियंत्रण असलेल्या १० कमांड सेंटर्सना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात हिजबुल्ल्हाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

सध्या ही परिस्थिती अमेरिका (America) इराण शांतता चर्चेत अडथळा ठरत आहे. अमेरिकेचा अब्बास बंदरावरील हल्ला आणि इस्रायलचा लेबनॉनमध्ये कहर यामुळे युद्ध पुन्हा पेटण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

US Iran Strike : शांततेच्या प्रयत्नांना मोठा सुरुंग? होर्मुझच्या खाडीत अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, पुन्हा युद्धाचे ढग गडद?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ला का केला ?

    Ans: अमेरिकेने स्वसंरक्षणात्मक हल्ल्याचा हवाला देत इराणच्या अब्बास बंदरावर ग्रांउड स्टेशनवर हल्ला केल्याचे म्हटले.

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला?

    Ans: ट्रम्प यांनी इराणला अमेरिकेच्या सर्व अटी मान्य करण्याचा इशारा दिला आहे. अटी मान्य न झाल्यास त्यांच्यावर थेट लष्करी कारवाईचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

  • Que: अमेरिकी हल्ल्यावर इराणने काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: २६ मे रोजी झालेल्या हल्ल्यावर इराणने संतप्त भूमिका घेत, याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे.

Web Title: Us strike iran second attack bandar abbas peace talks at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Israel
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
1

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
2

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा
3

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?
4

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.