NATO तून माघार घेणार अमेरिका? ट्रम्प प्रशासनाच्या खासदारांनी कॉंग्रेसमध्ये केले विधेयक सादर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
थॉमस यांनी नाटो आता विश्वासार्ह संघटना राहिली नसल्याचे म्हटले आहेत. यामुळे त्यांनी अमेरिकेने यातून ताबतोब माघार घ्यावी असे म्हटले आहे. ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाने सध्या या विधेयकावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेला नाही. नाटो संघटना ही ३२ देशांची लष्करी युती आहे. यामध्ये युरोपीय देश आणि दोन उत्तर अमेरिकेच्या देशांचा सहभाग आहे. या संघटनेचा हेतू राजकीय आणि लष्करी मदतीतून संघटनेच्या सदस्य देशांना स्वातंत्र्याची आमि सुरक्षिततेची हमी देणे आहे.
थॉमस मॅसी यांनी सादर केलेल्या प्रस्तावामध्ये नॉट अ ट्रस्टेड ऑर्गनाझेशन अक्ट सादर करण्यात आला आहे. या विधेयकात नाटोतून माघार घेण्याची काही मोठी कारणे देण्यात आली आहे.






