वॉशिंग्टन : कॅलिफोर्नियाच्या (California) जंगलामध्ये मोठा वणवा (Wildfire) लागला आहे. या पार्श्वभूमीवर कॅलिफोर्नियात आणीबाणी (Emergency) लागू करण्यात आली आहे. अमेरिकेच्या जंगलातील सर्वात मोठा वणवा मानला जात आहे. ही आग योसेमाइट नॅशनल पार्क (Yosemite National Park) जवळ वेगाने पसरत आहे.
ओक येथे (Oak Fire) लागलेली आग वेगाने पसरत आहे. अग्निशमन दलापुढे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कठीण आव्हान आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आग भीषण असून कर्मचाऱ्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
या परिसरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात आले आहे. आगीत अनेक घरे जळून खाक झाली आहे. या आग लागलेल्या परिसरातून सहा हजारहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मारिपोसा काउंटी (Mariposa County) येथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या या आगीवर पुढील आठवड्यापर्यंतही नियंत्रण मिळण्याची शक्यता नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कॅलफायरच्या (CalFire) प्रवक्त्या नताशा फॉउट्स यांनी सांगितले आहे की, पुढील आठवड्यातही आगीवर नियंत्रण मिळवण्याची शक्यता कमी आहे.