फोटो सौजन्य सोशल मीडिया
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे कि , अलीकडील ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या हल्ल्यांमुळे रशियाच्या तेल शुद्धीकरण क्षमतेपैकी तब्बल ५१ टक्के क्षमता ठप्प झाली आहे . त्यामुळे रशियन सैन्यात इंधन आणि लष्करी साहित्याचा पुरवठा करण्याच्या मॉस्कोच्या क्षमतेवर दबाव वाढल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे . हा आकडा स्वतंत्रपणे पडताळता आलेला नाही .
युक्रेनने रशियातील अनेक महत्वाच्या तेल शुद्धीकरण केंद्रावर हल्ले केले आहेत . मॉस्को यारोस्लाव्हल ,उस्त -लुगा , पर्म ,सारातोव्ह आणी सीझरान यांसारख्या भागातील ऊर्जा सुविधांना लक्ष करण्यात आल्याचे युक्रेनने म्हंटले आहे . काही रिफायनरीवर युद्ध सुरु झाल्यापासून अनेक वेळा हल्ले झाल्याचेही समोर आले आहे . वारंवार होणारे हल्ले , आपत्कालीन दुरुस्ती आणि देखभालातील विलंब यामुळे रशियाच्या तेल उद्योगावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .
Big Breaking: फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन
हल्ल्यांमुळे रशियामध्ये इंधन पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे . उपलब्ध माहितीनुसार रशियातील डिझेल उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांची घट झाली असून काही भागांमध्ये पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागल्या आहेत . परिस्थिती हाताळण्यासाठी रशियाने डिझेलच्या निर्यातीवर निर्बंधही कायम ठेवले आहेत . रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनीही या हल्ल्यांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे मान्य केले असून , त्याचा परिणाम देशाच्या GDP वर सुमारे १ टक्का असल्याचे त्यांनी म्हंटले आहे .
Breaking News: जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
युक्रेनच्या मते तेल शुद्धीकरण केंद्रावर हल्ले करण्यामागचा उद्देश केवळ रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणे नाही . तर रशियन सैन्याला मिळणाऱ्या इंधनाच्या पपुरवठ्यावरही परिणाम करणे हा आहे . युक्रेनने २०२६ मध्ये आपला लांब पल्ल्याच्या ड्रोनचा उत्पादन अंडी मोठी वाढ केल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे .
दुसरीकडे रशियाकडूनही युक्रेनच्या ऊर्जा आणि औद्योगिक पायाभूत सुविधांवर हल्ले सुरु आहेत . त्यामुळे युद्धाची तीव्रता आता रणांगणाबरोबरच ऊर्जा आणि इंधनाच्या पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचली आहे .






