JSW Combat SUV:   (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ऑटोमोबाइल

JSW Combat SUV: पैसे असूनही खरेदी करता येणार नाही ही SUV! फक्त 500 ग्राहकांसाठी खास नियम

JSW मोटर्स आपली पहिली SUV 'कॉम्बॅट' 3 डिसेंबर 2026 रोजी सादर करणार आहे. त्याआधी कंपनीने 'पायोनियर्स 500 एडिशन' ही मर्यादित आवृत्ती जाहीर केली आहे. या SUV च्या देशभरात केवळ 500 गाड्या तयार केल्या जाणार आहेत.

Riddhi Vanne
  • फक्त 500 SUV बनणार

  • खरेदीसाठी 1 लाखांची नोंदणी अनिवार्य

  • बोलीत निवड झालेल्यांनाच मिळणार गाडी

Limited Edition SUV India: भारतीय गाड्यांच्या बाजारात नव्याने आलेल्या JSW मोटर्सने आपली पहिली SUV 'कॉम्बॅट' लॉन्च होण्याआधीच लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता तयार केली. कंपनी 3 डिसेंबर 2026 रोजी या दमदार SUV चं अनावरण करणार. त्याआधी पायोनियर्स 500 ची एक खास लिमिटेड एडिशन जाहीर करण्यात आली. खिशात भरपूर पैसे असूनही प्रत्येकजण ही स्पेशल एडिशन SUV घेऊ शकणार नाही.

• फक्त 500 गाड्या, शोरूममध्ये मिळणार नाही

कंपनीने तिची संख्या आणि खरेदीची पद्धत खूपच मर्यादित ठेवली आहे. ही SUV सगळ्यांसाठी मिळणार नाही, कारण कंपनीने तिचे युनिट्स मर्यादित ठेवले. देशभरात 'पायोनियर 500 एडिशन' च्या फक्त 500 गाड्या बनवल्या जातील. शिवाय ती थेट साध्या शोरूममधून घेता येणार नाही. कंपनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर 28 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता अर्ज आणि बोली प्रक्रिया सुरू करेल.

• गाडी घ्यायची असेल तर काय करावं लागेल?

1. 1 लाख रुपये जमा करा : इच्छुक ग्राहकांना 1 लाख रुपये भरून नोंदणी करावी लागेल.

2. बोली लावावी लागेल : कंपनीने ठरवलेल्या किमान राखीव किंमतीपेक्षा जास्त बोली लावावी.

3. निवड झाली तरच गाडी : बोलीमध्ये निवड झालेल्या 500 लोकांनाच ही गाडी मिळेल.

• सामान्य मॉडेलपेक्षा काय वेगळं मिळणार?

या 500 गाड्यांना सामान्य मॉडेलपासून वेगळं दाखवायला कंपनी खास पर्सनलायझेशन देत आहे.

1. नावाची प्लेट : प्रत्येक SUV च्या केबिनमध्ये एक खास धातूची प्लेट असेल, ज्यावर मालकाचं नाव आणि तिचा 500 पैकी एक असलेला खास नंबर लिहिलेला असेल.

2. खास डिझाईन : बाहेरच्या आणि आतल्या भागावर खास नक्षीकाम केलेलं असेल.

3. गिफ्ट : कंपनीकडून खरेदीदारांना एक खास आठवणीची भेटवस्तू पण दिली जाईल.

• फक्त गाडी नाही, VIP सुविधा पण मिळणार

पायोनियर्स 500 एडिशन घेणाऱ्या ग्राहकांना फक्त गाडीच नाही, तर अनेक VIP सुविधा पण मिळतील.

1. खास मालक समुदाय : हे निवडक 500 मालक एका खास मालक समुदायाचा भाग असतील.

2. थेट संपर्क : त्यांना JSW मोटर्सच्या वरिष्ठ नेतृत्वाशी व विचारवंतांशी थेट बोलायची संधी मिळेल.

3. प्रायोरिटी सेवा : त्यांना खास रिलेशनशिप मॅनेजर, प्राधान्य सेवा आणि कंपनीच्या खास कार्यक्रमांसाठी खास आमंत्रण मिळेल.

• गाडी कशी दिसणार, इंजिन कसं असेल?

टीझर फोटोंवरून हे साफ दिसतंय की, JSW कॉम्बॅट ही जागतिक बाजारातल्या जेटूर T2 वर आधारित एक दणकट, चौकोनी आकाराची SUV असेल. यात रुंद ग्रिल, सपाट छत, चौकोनी व्हील आर्च आणि मागे स्पेअर व्हील कव्हर ही वैशिष्ट्यं आहेत. 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसोबत प्लग-इन हायब्रीड सिस्टीम असण्याची शक्यता आहे. पूर्ण टाकी आणि बॅटरीसह ही गाडी 1,100 किमी पेक्षा जास्त अंतर पार करू शकेल. याची डिलिव्हरी जानेवारी 2027 च्या मध्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Mumbai Crime: महिलांसाठी मुंबई असुरक्षितच! मुलगी प्लॅटफॉर्मवर उभी असताना आईवर शौचालयात मारहाण अन्....; घाटकोपर रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

Travel: मुंबईतील ५ अनोखी पर्यटनस्थळे, शहरातच घ्या निसर्गचा आणि इतिहासाचा आनंद!

RBI New ATM PoS Rules : फेल ATM व्यवहारांवरही लागणार चार्ज? किती वेळा मोफत काढता येणार पैसे? RBI ची नवी नियमावली

Pakistan Crisis : पाकिस्तानची आरोग्यसेवा धोक्यात! औषध उत्पादनात 21.5% घट; स्टेंट आणि ऑक्सिजनअभावी शस्त्रक्रिया रखडल्या

Pyaade Trailer: जिमी शेरगिल आणि प्रनूतन बहलची दमदार एन्ट्री! ‘प्यादे’चा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाची उत्सुकता वाढली