नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारचं हा चौथं अर्थसंकल्प होता. कोरोना काळात कोलमडलेली अर्थव्यवस्था रुळावर आणून महागाई नियंत्रणात आणणे हे सर्वात मोठं आव्हान सरकारसमोर आहे. मात्र, यंदाच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा सर्वसामानांच्या निराशा करणाऱ्या आहेत(60 lakh jobs, 80 lakh houses, TVs in schools, passports with digital chips. 400 bullet trains and ... TOP 20 announcements in the budget).
60 लाख नोकऱ्या, 80 लाख घर, शाळांमध्ये TV,डिजीटल चीप असलेले पासपोर्ट. 400 बुलेट ट्रेन अशा विविध घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत.
बजेट मधील TOP 20 घोषणा
1. पोस्ट ऑफिसमध्ये बँकिंग सुविधा आणि ATM देखील मिळणार
2. राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा
3. 3 वर्षात नव्या 400 बुलेट ट्रेन येणार
4. येत्या 2 वर्षात देशात 80 लाख घर तयार केली जाणार
5. शाळांमध्ये प्रत्येक वर्गात tv बसवला जाणार
6. MSP चे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
7. 100 टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देणार
8. झीरो बजेट शेतीला प्रोत्साहन देणार
9. 5 जीची नवी बोली लागणार, टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या रोजगार संधी
10. 44.605 कोटी खर्चून केन बेटवा लिंकद्वारे 9.62 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार
11. नदी जोड प्रकल्प राबवणार
12. पंतप्रधान आवास योजनेचा ८० लाख लोकांना यावर्षी होणार फायदा
13. बजेटमध्ये डिजिटलायझेशन वर जोर!
14.अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा नाही, आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
15. डोंगराळ भागातील रस्त्यांना 'पर्वतमाला' योजनेतून महत्व दिलं जाणार
16. सरकारी टेंडरचे नियम बदलणार, संपूर्ण प्रक्रिया Digital होणार
17. येत्या आर्थिक वर्षात 'डिजीटल रुपी' लाँच होणार
18. आपत्कालीन विम्यांतर्गत 5 लाखांची मदत
19. महिलांसाठी तीन नव्या योजना सुरु करणार
20. यंदाच्या वर्षापासून देशात ई-पासपोर्ट उपलब्ध होतील आणि त्यात डिडीटल चिप असतील