(फोटो सौजन्य: सोशल मीडिया) 
Business

Dividend Stock : गुंतवणूकदारांची 'बल्ले बल्ले'! 'हा' शेअर देतोय वर्षभरात 77% रिटर्न आणि प्रति शेअर 30 रुपये Dividend

Dividend म्हणजे लाभांश गुंतवणूकदारांच्या कमाईत मोठी भर घालत असतो. असाच एक स्टॉक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे, ज्याने गेल्या वर्षभरात ७७ टक्क्यांचा जबरदस्त परतावा आणि वर डिव्हिडंड देण्याचीही घोषणा केली आहे.

Ankita Karangutkar
  • कंपन्यांकडून मिळणारा Dividend गुंतवणूकदारांची कमाई
  • कंपनीच्या नफ्यात ९५% वाढ
  • विमा क्षेत्रात एन्ट्रीची तयारी

Muthoot Finance Announcment : शेअर बाजारात केवळ शेअर्सच्या किमती वाढल्यानेच फायदा होतो असे नाही, तर कंपन्यांकडून मिळणारा डिव्हिडंड (Dividend) देखील गुंतवणूकदारांच्या कमाईत मोठी भर घालत असतो. असाच एक स्टॉक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे, ज्याने गेल्या वर्षभरात ७७ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे आणि आता प्रति शेअर ३० रुपये डिव्हिडंड देण्याचीही घोषणा केली आहे.

कोणता आहे हा स्टॉक?

देशातील सर्वात मोठी गोल्ड लोन कंपनी, मुथूट फायनान्सने प्रति शेअर ३० रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. याचा अर्थ, ज्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स आहेत त्यांना प्रति शेअर ३० रुपये मिळणार आहेत. ही रक्कम कंपनीच्या दर्शनी मूल्याच्या अंदाजे ३००% आहे. यापूर्वी, कंपनीने २०२५ मध्ये २६ रुपयांचा लाभांश दिला होता. मुथूट फायनान्सच्या शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना ७७% इतका परतावा दिला. लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख १७ एप्रिल, २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, केवळ तेच गुंतवणूकदार या रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स घेतील, जे या मोठ्या लाभांशासाठी पात्र असतील. कंपनीने म्हटले आहे की, लाभांशाची रक्कम पात्र गुंतवणूकदारांच्या बँक खात्यांमध्ये ३० दिवसांच्या आत थेट जमा केली जाणार आहे.

कंपनीच्या नफ्यात ९५% वाढ

मुथूट फायनान्सचा आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफा, मागील वर्षीच्या याच कालावधीतील ₹१,३६३ कोटींच्या तुलनेत, जवळपास ९५% वाढून ₹२,६५६ कोटी झाला आहे. कंपनीच्या निव्वळ व्याज उत्पन्नातदेखील ६४% ची मोठी वाढ दिसून आली. बिजनेस वॉल्यूमआणि गोल्ड लोनच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीची बॅलेंस शीट चांगलीच मजबूत झाली आहे.

विमा क्षेत्रात एन्ट्रीची तयारी

मुथूट फायनान्स आता विमा कॉर्पोरेट एजन्सी व्यवसायात प्रवेश करत आहे. आपल्या महसुलाचे स्रोत वाढवण्यासाठी आणि त्यात विविधता आणण्यासाठी, कंपनी आपल्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये सुधारणा करणार आहे. या निर्णयामुळे कंपनी केवळ सुवर्ण कर्जांपुरती मर्यादित न राहता, एक बहु-वित्तीय सेवा प्रदाता म्हणून स्थापित होईल.

१ वर्षात ७७% रिटर्न

गेल्या वर्षभरात मुथूट फायनान्सची शेअर बाजारातील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. कंपनीने एका वर्षात सुमारे ७७% चा प्रभावी परतावा दिला आहे. गेल्या महिन्यात शेअरमध्ये १३% वाढ झाली आहे. १० एप्रिल रोजी, शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर मुथूट फायनान्सचा शेअर २.८४% वाढीसह ₹३,५७३.९० वर बंद झाला. सुमारे ₹१.४३ लाख कोटींच्या बाजार भांडवलासह, ही कंपनी गोल्ड लोन क्षेत्रात आपले वर्चस्व कायम ठेवत आहे.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन असल्याने, गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुम्हाला होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी नवराष्ट्र जबाबदार राहणार नाही.)

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक