pokokgopfkgfdfg 
ख्रिसमस सेलिब्रेशन

टीम इंडियाचा हा खेळाडू कसोटी कर्णधार होण्यासाठी अजिबात फिट नाही-रिकी पाँटिंग

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयने अजूनही नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा केलेली नाही. नवीन कसोटी कर्णधारासाठी बीसीसीआयला कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

Payal Hargode

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने टीम इंडियाच्या नव्या कसोटी कर्णधाराबाबत मोठा दावा केला आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूला पुढील कसोटी कर्णधारपदाचा दावेदार मानले जात आहे,  पण तो सध्या कर्णधारपदासाठी अजिबात लायक नाही असे वक्तव्य रिकी पॉन्टिंगने केले आहे.

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयने अजूनही नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा केलेली नाही. नवीन कसोटी कर्णधारासाठी बीसीसीआयला कोणताही पर्याय उपलब्ध नाही. विराट कोहलीने अचानक कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना धक्काच बसला आहे. कसोटीचा नवा कर्णधार कोण होणार याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

हा खेळाडू कसोटी कर्णधार होण्याच्या लायकीचा अजिबात नाही

अचानक कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर कसोटीचा नवा कर्णधार कोणाला करायचे या विचारात बीसीसीआय  मग्न आहे. सध्या स्टार फलंदाज के.एल राहुल हा नवा कसोटी कर्णधार होण्यासाठी मोठा दावेदार मानला जात आहे. पण रिकी पाँटिंगच्या मते, के.एल राहुल टीम इंडियाचा कसोटी कर्णधार होण्यास अजिबात पात्र नाही. के. रिकी पाँटिंग म्हणाला की, मी के.एल राहुलबद्दल खूप ऐकले आहे की, तो एक महान फलंदाज आहे, परंतु तो अजूनही नवीन आहे. 

 पण विराट कोहलीसारखा कोणीच नाही

कर्णधार म्हणून विराट कोहलीचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. विराट कोहलीने ६८ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी त्याने ४० कसोटी जिंकल्या आहेत आणि १७ कसोटी सामन्यात पराभव झाला आहे. आत्तापर्यंत विराट व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय कर्णधाराने इतके कसोटी सामने जिंकलेले नाहीत. हा भारतीय कर्णधाराचा विक्रम आहे. महेंद्रसिंग धोनी ६० कसोटीत २७ कसोटी विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर सौरव गांगुली ४९ कसोटींमध्ये २१ विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कोहलीच्या जवळपासही कोणी नाही

 विराट कोहलीनेही कर्णधार म्हणून आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले आहे. विराटने ६८ कसोटी सामन्यांच्या ११३ डावांमध्ये ५०.८० च्या सरासरीने ५८६४ धावा केल्या आहेत. विराटने कर्णधार म्हणून २० शतके ठोकली असून १८ अर्धशतके केली आहेत. कर्णधार म्हणून धावांच्या बाबतीतही विराट इतर सर्व कर्णधारांपेक्षा खूप पुढे आहे. विराटनंतर महेंद्रसिंग धोनीचा नंबर लागतो ६० कसोटीत ३४५४ धावा. त्याचबरोबर महान फलंदाज सुनील गावस्कर ४७ कसोटीत ३४४९ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Best Touring Bikes Under 5 lakhs: भारतातील 5 लाख रुपयांखालील सगळ्यात भारी टुरिंग बाईक्स! आत्ताच पाहा

Saryu Kamla Express: प्रभू रामांची अयोध्या ते माता सीतेचे जनकपूर फक्त 19 तासांत; भारत-नेपाळ दुसरी थेट रेल्वे सुरू, वाचा नियम

कानाला क्लिपसारखे दिसणारे Earbuds!

Salary vs Experience: तुम्हाला अनुभव आणि कामानुसार योग्य पगार मिळतोय का? ओळखून घ्या हे ५ महत्त्वाचे संकेत

वाढदिवसाचा केक कापताना वाद, तरुणावर घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार वार; लोणी काळभोर भागातील घटनेनं खळबळ