सौजन्य फोटो - सोशल मिडीया  Engineering Student Death
क्राईम

माझ्या बाळाला परत आणा, मला कोणाकडून काहीच नको!" बोपदेव घाटातील अपघातात सिद्धेशचा मृत्यू; आईचा काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा...

बोपदेव घाटात भरधाव टेम्पोने बस स्टॉपवरील तिघा विद्यार्थ्यांना चिरडलं! "माझ्या बाळाला परत आणा..." इंजिनिअरिंगच्या सिद्धेशच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा

Sanofar Nayakawadi
  • बोपदेव घाटात भरधाव टेम्पोने विद्यार्थ्यांना चिरडल्याने तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

  • एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूने सिद्धेश राजेच्या आईने "बाळाला परत आणा" असा केला आक्रोश

  • चालकाच्या 'ब्रेक फेल' दाव्यावर सवाल उपस्थित करत कठोर कारवाई व मदतीची मागणी

पुण्यातील बोपदेव घाटात बुधवारी एक अतिशय दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना समोर आली. घाटातून जाणाऱ्या एका भरधाव आयशर टेम्पोने बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातीलच एक तरुण म्हणजे सिद्धेश राजे. लेकाच्या अशा जाण्यानं कुटुंबानं हंबरडा फोडला आहे.

मला कोणाकडून काहीच नको, माझ्या बाळाला परत आणा...

घरची परिस्थिती बिकट असताना वडिलांनी कर्ज घेऊन लेकाला शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकर वाडी परिसरात भाड्याचं घर घेऊन लेकाला शिक्षणासाठी तिथं ठेवलं. मात्र, शेतकरी कुटुंबातील एकुलत्या एका मुलावर काळाने घाला घातल्याने, सिद्धेश राजे याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईने माध्यमांसमोर बोलताना मोठा हंबरडा फोडला. "मला कोणाकडून काहीच नको. मी कालपासून माझ्या बाळाची वाट बघतेय. माझ्या बाळाला परत आणा," असं म्हणत त्यांनी हंबरडा फोडला. यासोबतच या अपघाताला कारणीभूत असलेल्याला जिवंत सोडू नका, अशी मागणीही त्यांनी केली.

पहिलाच पेपर देऊन घरी परतताना काळाने गाठले

सिद्धेश इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. तो तिसऱ्या वर्षाचा पहिलाच पेपर देऊन घरी परतत असताना काळानं घाला घातला. बोपदेव घाट परिसरातील गारवा हॉटेलसमोर बस स्टॉपवर थांबलेल्या सिद्धेश राजे, मोहिनी चौधरी आणि विशाल दांगडे या तिघा विद्यार्थ्यांना काल दुपारी भरधाव आयशर टेम्पोने चिरडलं. या अनियंत्रित टेम्पोने इतर एक-दोन वाहनांनाही धडक देत सुसाट वेगात पळ काढला.

'ब्रेक फेल' दाव्यावर सवाल; सीसीटीव्ही समोर

या संपूर्ण घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. याबद्दल बोलताना चालकानं सांगितलं, की टेम्पोचे ब्रेक फेल झाले होते. मात्र, "टेम्पोचे ब्रेक फेल झाले होते तर पुढे लोकांनी अडवल्यावर तो कसा थांबला?" असा सवाल उपस्थित करत या अपघाताची कसून चौकशी करून चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. यासोबतच मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सिद्धेशच्या काकांनी केली आहे.

ण्यातील बोपदेव घाट अपघातात कोणत्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला?

बोपदेव घाट परिसरातील गारवा हॉटेलसमोर बस स्टॉपवर थांबलेल्या सिद्धेश राजे, मोहिनी चौधरी आणि विशाल दांगडे या तीन विद्यार्थ्यांचा भरधाव आयशर टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत.

सिद्धेश राजे कोणत्या वर्गात शिकत होता?

सिद्धेश राजे हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता आणि पहिलाच पेपर देऊन घरी परतत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला.

अपघातानंतर चालकाच्या कोणत्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे?

चालकाने टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याचा दावा केला आहे; मात्र ब्रेक फेल होते तर पुढे नागरिकांनी अडवल्यावर टेम्पो कसा थांबला, असा सवाल उपस्थित करत कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Credit Card 30 Percent Rule : Credit Card वापरताय? सावधान! लिमिट 30% च्या पुढे नेऊ नका! घसरू शकतो तुमचा CIBIL Score

Trending Now : 6 महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे भाषण अन् दुसऱ्या महिला खासदाराने...; ऑस्ट्रेलियन संसदेतील भावूक Video Viral

Drought Affected Farmers Scheme : शेतीला जोडधंद्याचा आधार! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती येणार रिक्षाचे स्टेअरिंग, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

नाद करा पण कोल्हापूरचा कुठं! राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले विजेतेपद; तर 'या' संघांना थेट...

Bhandara News: गावोगावी विहिरी बनल्या कचराकुंड्या! साकोली-भंडाऱ्यात जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाची गरज...