शिक्षण

बुलढाण्यात संगणक-टंकलेखन परीक्षेत घोटाळा उघड, केंद्रावर न जाता विद्यार्थी बाहेरून देत होते परीक्षा!

Typing Exam2024 : मागील काही दिवसांपासून देशात नीट परीक्षेतील घोट्याळ्याचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. अशातच आता राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन परीक्षेचा मोठा घोटाळा समोर येत आहे.

गोरक्षनाथ ठाकरे

देशात नीट परीक्षेचा घोटाळा गाजत असतानाचा संगणक-टंकलेखन परीक्षेचा घोटाळा देखील समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात संगणक टंकलेखन परीक्षेत हा मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे संगणक-टंकलेखन परीक्षा ही ऑनलाईन असते. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न जाता बाहेरून ही परीक्षा देत असल्याचा धक्क्कादायक प्रकार सुरु होता. मात्र, राज्य शिक्षण मंडळाच्या सतर्कतेने हा संपूर्ण घोटाळा समोर आला आहे.

परीक्षा केंद्रावर केवळ 14 विद्यार्थी

पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून सध्या इंग्रजी माध्यमाची संगणक-टंकलेखन परीक्षा सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात या परीक्षेचे जवळपास सात केंद्र आहेत. मात्र, गुरुवारी (ता.14) चिखली येथील अनुराधा इंजीनियरिंग कॉलेजच्या परीक्षा सुरू असताना केवळ 14 विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे आढळून आले आहे. या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात 22 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष 22 विद्यार्थ्यांनी अ‍ॅक्सेस घेतल्याचे दिसून आले आहे.

व्हिडिओ कॉलद्वारे पडताळणी

चिखली येथील अनुराधा इंजीनियरिंग कॉलेजमध्ये परीक्षेवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखवण्यास सांगितले. मात्र, परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात १४ विद्यार्थी परीक्षा देत होते. त्यामुळे इतर आठ विद्यार्थी कुठे आहेत? अशी विचारणा अध्यक्षांकडून करण्यात आली असता, केंद्रप्रमुखांना त्याबाबत स्पष्टीकरण देता आले नाही. याउलट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संबंधीत केंद्रावरुन २२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अ‍ॅक्सेस घेतलेला होता. अर्थात इतर आठ विद्यार्थी हे घरून किंवा इतर कुठून तरी परीक्षा देत होते.

शिक्षणाधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल

दरम्यान, ही परीक्षा देताना इतर विद्यार्थी हे कोणत्या ठिकाणावरून परीक्षा देत होते. ते बाहेरील जागेवरून संगणक-टंकलेखन परीक्षेसाठी जॉईन कसे झाले? याबाबत माहिती समजताच शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधीत परीक्षा केंद्रावर धाव घेतली. कारण या परीक्षेचा युजर आयडी व पासवर्ड हा फक्त केंद्र प्रमुख यांच्याकडेच असतो. बुलढाणा जिल्ह्यातील सातही परीक्षा केंद्रावर हा प्रकार सुरु होता, असे सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले