Fifa World Cup 2022

केरळमधील धर्मगुरूंचा मुस्लिमांना सल्ला; फुटबॉलचे वेड इस्लामविरोधी

केरळ जाम-इय्याथुल उलामाशी संबंधित कुतुबा समितीचे सरचिटणीस नसर फैझी कूदाथयी यांनी फुटबॉल चाहत्यांनी अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो आणि ब्राझीलचा नेमार जूनियर यांच्या कटआउटवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केल्याबद्दल चिंता व्यक्त केली. कतारमधील खेळांमुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड कमी होत आहे, असे ते म्हणाले.

Ganesh Mate

थिरुअनंतपुरम - केरळमधील (Kerala) एका मुस्लिम संघटनेने राज्यातील फुटबॉल-वेड्या तरुणांवर आक्षेप घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात (Footbal World Cup) सहभागी होणाऱ्या त्यांच्या संघांच्या समर्थनार्थ स्टार खेळाडूंचे कटआऊट (Star Players Cutouts) लावणे, फुटबॉलच्या कटआउट्सची पूजा करणे हे इस्लामविरोधी (Pooja Against Islam) आहे. तसेच अनेक देशांची वाताहत करणाऱ्या पोर्तुगालचा (Portugal) त्यांनी झेंडा फडकवू नये, असे या संघटनेने सांगितले.

केरळ जाम-इय्याथुल उलामाशी संबंधित कुतुबा समितीचे (Khutbah Committee) सरचिटणीस नसर फैझी कूदाथयी यांनी फुटबॉल चाहत्यांनी अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो आणि ब्राझीलचा नेमार जूनियर यांच्या कटआउटवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केल्याबद्दल चिंता व्यक्त केली. कतारमधील खेळांमुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड कमी होत आहे, असे ते म्हणाले.

मौलवी नसर फैझी कूदाथयी म्हणाले, अनेक देशांची वाताहत करणाऱ्या पोर्तुगालचा ध्वज फडकवणे योग्य नाही. खेळाडूच्या दृष्टीकोनातून खेळाकडे पाहिले पाहिजे. फुटबॉल हा ताप बनत चालला असून त्याचे लोकांना व्यसन होत आहे. शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देणारा खेळ म्हणूनच खेळाचा प्रचार व्हायला हवा. त्याऐवजी, चाहते क्रीडा-तारकांची पूजा करण्यात मग्न आहेत. आज हे लोक इतर देशांच्या झेंड्यांचा आदर करत आहेत आणि इतर देशांचे झेंडे फडकवत आहेत, असा त्यांनी आक्षेप घेतला.

Best Touring Bikes Under 5 lakhs: भारतातील 5 लाख रुपयांखालील सगळ्यात भारी टुरिंग बाईक्स! आत्ताच पाहा

Saryu Kamla Express: प्रभू रामांची अयोध्या ते माता सीतेचे जनकपूर फक्त 19 तासांत; भारत-नेपाळ दुसरी थेट रेल्वे सुरू, वाचा नियम

कानाला क्लिपसारखे दिसणारे Earbuds!

Salary vs Experience: तुम्हाला अनुभव आणि कामानुसार योग्य पगार मिळतोय का? ओळखून घ्या हे ५ महत्त्वाचे संकेत

वाढदिवसाचा केक कापताना वाद, तरुणावर घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार वार; लोणी काळभोर भागातील घटनेनं खळबळ