Rajgira Kheer: उपवासात गोड खाण्याची इच्छा झाल्यास नक्की ट्राय राजगिऱ्याची पौष्टिक खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी  
लाइफ स्टाइल

Navratri 2026 : उपवासात गोड खाण्याची इच्छा झाल्यास नक्की ट्राय राजगिऱ्याची पौष्टिक खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Navratri 2026: आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्दतीमध्ये राजगिऱ्याची पौष्टिक खीर बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीसोबत शरीरासाठी सुद्धा खूप जास्त गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

सुरुची कदम

Navratri 2026: शारदीय नवरात्री उत्सवाला ११ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे आंनद आणि उत्साहाचे वातावरण असते. या नऊ दिवसांमध्ये महिलांसह पुरूषसुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवसांमध्ये आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. अशावेळी अन्नपदार्थांच्या सेवनासोबतच भरपूर पाणी सुद्धा प्यावे. उपवासाच्या दिवशी कायमच वेर्फस आणि तेळकट पदार्थ खाल्ले जातात. पण वांरवांर तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी राजगिऱ्याची पौष्टिक खीर खावी. राजगिऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम, लोह, फायबर आणि इतरही अनेक घटक आढळून येतात. उपवासाच्या दिवशी आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. राजगिऱ्याची पौष्टिक खीर बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य लागते आणि कमी वेळात पदार्थ तयार होतो. चला तर जाणून घेऊया राजगिऱ्याची पौष्टिक खीर बनवण्याची रेसिपी. (फोटो सौजन्य – pinterest)

साहित्य:

  • राजगिरा
  • साखर
  • सुका मेवा
  • वेलची पावडर
  • काजू
  • बदाम
  • दूध
  • केशर
  • मखाना
  • तूप

कृती:

  • राजगिऱ्याची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम. वाटीमध्ये राजगिरा घेऊन त्यात पाणी घालून ३ तास भिजत ठेवा. यामुळे राजगिरा मऊ होईल.
  • कढईमध्ये मखाने मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. जेणेकरून चव आणखीनच सुंदर लागेल.
  • कढईमध्ये पाणी आणि तूप घालून पाण्याला उकळी काढा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भिजवलेला राजगिरा आणि मखाने घाला.
  • कढईवर झाकण ठेवून ४ ते ५ मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्या. राजगिरा आणि मखाना मऊ झाल्यानंतर त्यात आटवून घेतलेले दूध घाला आणि चमच्याने सतत ढवळत राहा.
  • त्यानंतर त्यात साखर, वेलची पावडर, तुपात भाजलेला सुका मेवा आणि केशर काड्या घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • खीर दाटसर झाल्यानंतर गॅस बंद करून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली टेस्टी राजगिऱ्याची खीर.

Todays Gold-Silver Price: मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत सोन्याचे दर काय? एका क्लिकवर जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचा भाव

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

तुकाराम मुंढेंचा FDA च्या सहाय्यक आयुक्तालाच दणका; निष्काळजीपणामुळे थेट निलंबितच केलं

Delimitation Bill : फेररचनेनंतर लोकसभेतील सदस्यसंख्या 273 ने वाढणार; एकूण संख्या 543 वरून 816 वर जाणार

Gajakesari Raja Yoga: ३० नोव्हेंबरला तयार होणार गजकेसरी योग, सिंह आणि कर्क राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा