Navratri Fast: उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात प्या टेस्टी राजगिऱ्याची स्मूदी, दिवसभर शरीरात टिकून राहील ऊर्जा  
लाइफ स्टाइल

Navratri Fast: उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात प्या टेस्टी राजगिऱ्याची स्मूदी, दिवसभर शरीरात टिकून राहील ऊर्जा

Navratri Fast: उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा खिचडी बनवून खाण्याऐवजी वेगवेगळ्या हेल्दी पदार्थांपासून बनवलेल्या स्मूदीचे सेवन करावे. यामुळे शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

सुरुची कदम

Navratri Fast: नवरात्री उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. याशिवाय महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, बऱ्याचदा सुचत नाही. कायमच तेलकट किंवा साबुदाणा खिचडी खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्यादिवशी सहज पचन होणाऱ्या अतिशय हलक्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारी राजगिरा स्मूदी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली स्मूदी चवीला अतिशय सुंदर लागते. नऊ दिवसांच्या उपवासामध्ये शरीरातील ऊर्जा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सहज पचन होणाऱ्या आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया राजगिऱ्याची स्मूदी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

साहित्य:

  • राजगिरा
  • काजू बदाम
  • वेलची पावडर
  • दूध
  • केशर काड्या
  • अंजीर
  • खजूर
  • केळी

कृती:

  • राजगिऱ्याची स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात राजगिरा मंद आचेवर भाजा. राजगिरा भाजताना गॅस जास्त फास्ट ठेवू नये.
  • भाजून घेतलेला राजगिरा ताटात काढून घ्या. त्याच कढईमध्ये काजू आणि बदाम भाजून मंद आचेवर भाजा.
  • भाजलेले सर्व साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाका आणि जाडसर बारीक वाटून घ्या. त्यामध्येच खजूर, अंजिराचे तुकडे आणि एक केळ घालून मिश्रण तयार करा.
  • पेस्ट तयार केल्यानंतर त्यात तुमच्या आवश्यकतेनुसार दूध घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली राजगिऱ्याची हेल्दी टेस्टी स्मूदी. स्मूदी प्यायल्यानंतर पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.

Todays Gold-Silver Price: मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत सोन्याचे दर काय? एका क्लिकवर जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचा भाव

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

तुकाराम मुंढेंचा FDA च्या सहाय्यक आयुक्तालाच दणका; निष्काळजीपणामुळे थेट निलंबितच केलं

Delimitation Bill : फेररचनेनंतर लोकसभेतील सदस्यसंख्या 273 ने वाढणार; एकूण संख्या 543 वरून 816 वर जाणार

Gajakesari Raja Yoga: ३० नोव्हेंबरला तयार होणार गजकेसरी योग, सिंह आणि कर्क राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा