महाराष्ट्र

विधिमंडळ परिसरात गणपतराव देशमुख यांचे स्मारक उभारणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सांगोल्यात पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Aparna
सोलापूर: स्व. गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे विधी मंडळाचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात त्यांचे स्मारक उभारण्याबाबत सर्व पक्षाचे एकमत आहे. विधिमंडळाच्या दोन्ही अध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच स्व. गणपतराव देशमुख यांचे लोकांना दिसेल असे स्मारक उभारणार अाहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित स्व. गणपतराव देशमुख यांचे स्मारक व महाविद्यालय नामांतर सोहळा कार्यक्रमात ते बाेलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते.
यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार संजय पाटील, आमदार जयंत पाटील, बबनराव शिंदे, संजय शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, शहाजी पाटील, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, राजेंद्र राऊत, यशवंत माने, राम शिंदे, माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक, महादेव जानकर, दीपक साळुंखे पाटील, सूतगिरणीचे संचालक चंद्रकांत देशमुख, शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुखआदी उपस्थित होते.
रतनबाई गणपतराव देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार हनुमंत गोवरे यांनी मानले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचे प्रश्न अत्यंत धडाडीने मांडले. सामन्याच्या उत्थानासाठी सातत्याने ते जीवनभर झटत होते. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. मात्र राजकारणातील शाश्वत सत्य हे गणपतराव देशमुख होते, त्यांनी परिवर्तनाचे सर्व नियम बाजूला ठेवून एकाच विचाराने काम के्लयाचे गौरवोद‌्गार त्यांनी काढले.

सांगोला तालुक्यातील नागरिकांनी गणपतराव देशमुख यांना अकरा वेळा विधानसभेवर पाठवून या भागातील प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या मार्फत शासनाकडून न्याय मिळवून देण्याची मोठी कामगिरी करून घेतली असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी सांगितले.

गणपतराव ‘वन मॅन आर्मी’

विरोधी पक्षात असताना आम्ही एकलव्य म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडून खूप शिकलो. मंत्री पद गेल्यावर शासकीय वाहन सोडून एसटीने जाणारे नेते, सभागृह सुरू व्हायच्या अगोदर प्रथम येणारे आणि सभागृह संपल्यावर शेवटी जाणारे, एकही दिवस सुट्टी न घेणारे आमदार, वन मॅन आर्मी म्हणजे गणपतराव अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली.

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक