लोणावळा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका टिप्पनी करून तेढ निर्माण करणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी लोणावळा शहर भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उप नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, अभय पारेख, ललित सिसोदिया, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष शौकत शेख, सागर बेलुरे, साजिद बेपारी, शारुख शेख, दिपक विकारी, कादिर मुगल, आशिष गुप्ता, रिजवान खान, सोहन माथरे, फरीद बेपारी, दीपक कनोजिया, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.
- जाधवांकडून केंद्रीय मंत्र्यांवर पातळी सोडून टीका
निवेदनात म्हटले आहे की, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे कुडाळ येथे केंद्र मंत्री राणे तसेच त्यांच्या कुटुंबियांवर अतिशय घाणेरडया भाषेत टीका केली. भास्कर जाधव यांचे कृत्य हे एका मनोरुग्णाप्रमाणे होते व कोणत्याही लोकशाहीला धरून नाही तसेच ते कायम आक्रमक बोलून दोन पक्षातील कार्यकर्त्यामध्ये म्हणजेच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.