महाराष्ट्र

गौतमीचा कार्यक्रम अन पोलिसांच्या डोक्याला ताप ; कार्यक्रमापेक्षी बंदोबस्ताचा खर्च जास्त; तब्बल 106 पोलीस आणि अधिकारी तैनात

पोलीस बंदोबस्ताच्या खर्चापोटी आबा मोटेंनी दिले पाच लाख

Aparna
पंढरपूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सोमाआबा मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  तब्बल 106 पोलीस आणि अधिकारी तैनात होते. पोलीस बंदोबस्ताच्या खर्चापोटी आबा मोटे यांनी पाच लाख रुपये पोलीस स्टेशनला जमा केले. कार्यक्रमापेक्षा बंदोबस्ताचा खर्च जास्त झाला.
सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासपचे नेते सोमाआबा मोटे यांनी आयोजित केलेला गौतमीचा कार्यक्रम शांततेत आणि दणक्यात पार पडला. गौतमीला पाहून घेरडीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणाईची हुल्लडबाजी पाहाता सांगोल्यातील कार्यक्रमात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला गेला होता.
गौतमी पाटीलने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीचं नाव पोहोचलं आहे. राज्यातल्या कोणत्याही भागात गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम असो, लोकांची तुफान गर्दी होते. लोकं झाडावर चढून, घराच्या-दुकानाच्या छतावर चढून गौतमीचा डान्स पाहताना दिसतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की राडा हमखास होतोच. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा असं जणून समीकरणंच बनलं आहे. गौतम पाटीलच्या कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी, वाद आणि मारहाण असे प्रकार सर्रास होताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबरोबरच पेड पोलीस बंदोबस्त ठेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांना पैसै द्यावे लागणार आहेत. म राज्यात सर्वत्र फॉर्म्युला वापरणार पेड पोलीस बंदोबस्त ठेण्याचा निर्णय घेतल्याने गौतमीच्या मानधनापेक्षा दुप्पट रक्कम पोलीस बंदोबस्तासाठी भरावी लागणार आहे. त्याची झलक सांगोला तालुक्यातील पोलिसांनी दाखवून दिली. कार्यक्रम घ्यायचा आहे ना, तर मग तगडा बंदोबस्त तैनात केला तरच कार्यक्रमास परवानगी मिळेल. बंदोबस्त फुकट दिला जाणार नाही. कारण हा सामाजिक हिताचा उपक्रम नव्हे. या धोरणातून राज्यात सर्वत्र हा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे.

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले