महाराष्ट्र

माझे सासरे पण शिंदेच होते...शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितला 'हा' किस्सा

शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DC Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले होते. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, विरोधक व सत्ताधारी एकाच मंचावर येणं हे खूप कमी वेळा घडतं. कालच्या कार्यक्रमात पवार, शिंदे व फडणवीस यांनी जोरदार टोलबाजी केली तसेच ऐकमेकांस चिमटे सुद्धा काढले.

Amrut Sutar

मुंबई : आज मुंबई क्रिकेट असोसिएशनची (Mumbai Cricket Association Election) निवडणुक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (बुधवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DC Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले होते. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, विरोधक व सत्ताधारी एकाच मंचावर येणं हे खूप कमी वेळा घडतं. कालच्या कार्यक्रमात पवार, शिंदे व फडणवीस यांनी जोरदार टोलबाजी केली तसेच ऐकमेकांस चिमटे सुद्धा काढले. दरम्यान, काल मंचावर शरद पवारांनी आपली शिंदे यांच्यासोबत सोयरिक कशी आहे, याचा किस्सा सांगितला.

दरम्यान, शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे पाहून हातवारे करुन माझे सासरे शिंदेच होते. असं म्हटलं आणि सभागृहातील सर्वांनी टाळ्यांचा कडकडात झाला. "माझे सासरे शिंदेच... आणि शिंदेंची मुलगी शरद पवारांची बायको आहे. त्यामुळे शिंदेंना आपल्या मुलीची काळजी नीट घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्याचा गांभीर्यानं विचार करावा, अशी विनंती करतो." असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. शिंदे घराण्याशी आपला खूप जवळचा संबंध आहे. सासरी गेलो की, शिंदे आपणाला खूप आदर द्यायचे. शरद पवारांनी आपले शिंदे यांच्याशी कसं नातं आहे, हे मुख्यमंत्र्यांना सांगितले. तेव्हा सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

Phulwara: ‘फुलवरा’चा लावणीसाज उलगडला! वैदेही परशुरामी-प्रियदर्शिनी इंदलकर अस्सल मराठमोळी झलक समोर!

Food tips: डार्क चॉकलेटचे किती प्रकार आहेत? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे!

Banks Offer : इलेक्ट्रिक वाहनांच्या युगात कमाईची मोठी संधी! Charging स्टेशनसाठी बँकांनी उघडला खजिना! मिळणार 10 कोटींचा निधी

Kalatmak Rajyog: डिसेंबरच्या सुरुवातीला कलात्मक योगाचा प्रभाव; कर्क राशीसह या राशींच्या लोकांना मिळणार करिअरमध्ये मोठे यश

Fashion: महाराष्ट्रीयन साड्यांचे आहेत अनेक प्रकार; पैठणीपासून नऊवारीपर्यंत जाणून घ्या प्रत्येक साडीची खासियत!