महाराष्ट्र

गौतमी पाटीलचा जबरा फॅन ! गावात शो असल्याने चक्क एसटी चालकाने मागितली रजा

लावणी अदाकारा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाची भुरळ सगळीकडेच दिसून येत आहे. गौतमीच्या अदा पाहण्यासाठी लोक इतके फिदा आहेत की, तासगाव आगारातील एका बसचालकाने त्यांच्या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम (Gautami Patil Show) होणार असल्याने दोन दिवस रजेची मागणी केली आहे.

कृपादान आवळे

तासगाव : लावणी अदाकारा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाची भुरळ सगळीकडेच दिसून येत आहे. गौतमीच्या अदा पाहण्यासाठी लोक इतके फिदा आहेत की, तासगाव आगारातील एका बसचालकाने त्यांच्या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम (Gautami Patil Show) होणार असल्याने दोन दिवस रजेची मागणी केली आहे. तसा उल्लेखच रजा अर्जावर केला आहे. हा रजा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या रजेची भलतीच चर्चा रंगली आहे.

मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील चर्चेत आलीय. तिच्या लावणी आणि स्टेज शोच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. याच गौतमी पाटीलचा तासगाव तालुक्यात 21 मे रोजी वायफळे येथे कार्यक्रम होणार आहे. गौतमीचा कार्यक्रम तोही पहिल्यांदाच तासगाव तालुक्यात होत असल्यामुळे या कार्यक्रमाची तालुक्यात गौतमीच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.

आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या गौतमीचे, सर्वच क्षेत्रात मोठे चाहते निर्माण झाले आहेत. केवळ सोशल मीडियावर पाहायला मिळणाऱ्या गौतमीचा कार्यक्रम प्रत्यक्ष आपल्याच गावात पाहायला मिळणार असल्यामुळे, तिच्या चाहत्यांसाठी ही संधी पर्वणीच. ही संधी साधण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या तासगाव आगारात चालक असणाऱ्या यमगरवाडी येथील एका चालकाने चक्क दोन दिवसांच्या रजेची मागणी केली आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी रजा

'गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवसांची रजा मिळावी.' असा उल्लेख रजा अर्जावर केला आहे. 22 आणि 23 मे रोजी दोन दिवसांची रजा मिळणेबाबत गुरुवारी आगार प्रमुखांकडे रजा अर्ज दिला आहे.

आमच्याकडे तसा अर्ज नाही

दरम्यान, या रजेच्या अर्जाबाबत तासगावचे आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी आमच्याकडे अद्याप अशा प्रकारचा रजा अर्ज आला नसल्याचे सांगितले.

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले