महाराष्ट्र

राज्य सरकारच्या उदासीनतेमुळं वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला, याविरोधात उद्या युवासेनेतर्फे राज्यभर निषेध मोहीम

राज्य सरकारच्या (State government) नाकर्तेपणामुळं हा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये (Gujrat) गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक फोडत आहेत. (Shinde fadnvis government) दरम्यान, यावरुनच आता युवासेना (Yuvasena) आक्रमक झाली असून, उद्या सरकारच्या विरोधात राज्यभर निषेध मोहीम (protest campaign) राबवणार आहे.

Amrut Sutar

मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असणारा वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या जनतेमध्ये नाराजीचं वातावरण आहे. यावरुन सध्या राज्यात बरेच आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. तसेच राज्य सरकारच्या (State government) नाकर्तेपणामुळं हा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये (Gujrat) गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक फोडत आहेत. (Shinde fadnvis government) दरम्यान, यावरुनच आता युवासेना (Yuvasena) आक्रमक झाली असून, उद्या सरकारच्या विरोधात राज्यभर निषेध मोहीम (protest campaign) राबवणार आहे.

दरम्यान, वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प "खोके सरकारच्या" हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला, यामुळे १ लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे उद्या (१५ सप्टेंबर) रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकात युवासेनेतर्फे निषेध मोहीम घेण्यात येणार आहे. या मोहीमेत अधिकाधिक संख्येनं लोकांनी सहभागी व्हावे असं आवाहन युवासेना सचिव वरुण सरदेसाईं (varun sardesai) यांनी केलं आहे.

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले