सिनेमा

आमिर खानच्या आई जीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका, ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

आमिर खान कुटुंबियांसोबत पाचगणीत कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेला होता.या दरम्यान त्याची आई जीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर आमिरने लगेचच त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केले.

Pravina Shirpurkar

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) आईबद्दल धक्कायदायक एक बातमी समोर आली आहे. आमिर खानची आई जीनत हुसेन (Zeenat Hussain) यांना काल रात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान कुटुंबियांसोबत पाचगणीत कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेला होता.या दरम्यान त्याची आई जीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर आमिरने लगेचच त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आमिरदेखील सध्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात आईसोबत आहे.

आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासून चर्चेत होता. मात्र, प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. या सिनेमात आमिरसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत होती.

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक